पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच पदाचा त्याग करतील अशी अपेक्षा विरोधी पक्ष करत असले तरी भारतीय जनतेच्या मनात मात्र ते नाही. इंडिया टुडे-सीव्होटर ‘मूड ऑफ द नेशन’च्या सर्वेक्षणात मोदी हेच पंतप्रधानपदाचे सर्वोत्तम पर्याय आहेत, हे समोर आले आहे. नरेंद्र मोदींच्या जवळपास राहुल गांधी नाहीत हेही हा अहवाल सांगतो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या स्वप्नांवर या अहवालाने पाणी फेरले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान म्हणून अजूनही निर्विवाद पसंतीचे उमेदवार असल्याचे इंडिया टुडे-सीव्होटर ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र, गेल्या १२ वर्षांपासून भाजपच्या निवडणूक विजयाच्या मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वीरित्या सारथ्य केले आहे. राहुल गांधी यांनी या अहवालात दुसरे स्थान कायम राखले असून, जानेवारी २०२६ मधील सर्वेक्षणाच्या तुलनेत त्यांच्या आकडेवारीत फारसा बदल झालेला नाही. मात्र, पहिल्या तीन पसंतींमध्ये एक नवा चेहरा दाखल झाला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि टीव्हीकेचे प्रमुख विजय हे राजकारणात स्वतःचे स्थान वेगाने निर्माण करत आहेत.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे ४८.७ टक्के लोकांनी मोदी यांना पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक योग्य मानले. जानेवारीतील ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणात मोदींना ५५ टक्के लोकांनी पसंती दिली होती. म्हणजेच त्यांच्या पसंतीत जवळपास ६ टक्के घट झाली आहे. मोदी यांच्या लोकप्रियतेत काहीशी घट झालेली असली तरी, जग एका संकटातून दुसऱ्या संकटाकडे जात असताना भारताचा मोदींवरील विश्वास कायम असल्याचे व्यापक चित्र या सर्वेक्षणातून दिसून येते.
२०२९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदी ७९ वर्षांचे होतील. त्यामुळे पुढील कार्यकाळासाठी ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.‘मूड ऑफ द नेशन’ हे इंडिया टुडे समूहाकडून वर्षातून दोनदा घेतले जाणारे सर्वेक्षण आहे.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी ४८.७ टक्के
राहुल गांधी २७.१ टक्के
विजय थलपती ९.२ टक्के
ममता बॅनर्जी २ टक्के
अखिलेश यादव १.७ टक्के
अभिजित दिपके १.३ टक्के
केजरीवाल १.२ टक्के
हे ही वाचा:
पंतप्रधानपदासाठी मोदींनाच पहिली पसंती, राहुल गांधींनंतर विजयचे नाव
अमेरिकेवर ४० ट्रिलियन डॉलरचे कर्ज
आठ सिमकार्ड पाकिस्तानात पाठवणारे दाम्पत्य अटकेत
राहुल गांधी दुसरे तर विजय तिसरे
मोदी आणि इतर नेत्यांमधील नेतृत्वाचे अंतर मात्र अजूनही मोठे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘मोदींना पर्याय कोण?’ या प्रश्नात ते इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मोठ्या फरकाने आघाडीवर राहिले आहेत. सध्याच्या सर्वेक्षणातही हे चित्र मोठ्या प्रमाणात कायम आहे.
दरम्यान, ऑगस्टच्या सर्वेक्षणानुसार २७.१ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पुढील पंतप्रधानपदासाठी योग्य मानले. जानेवारीच्या सर्वेक्षणात त्यांना २७ टक्के पसंती मिळाली होती. त्यामुळे यावेळी त्यात केवळ किरकोळ वाढ झाली आहे.
तरुणांशी, विशेषतः नव्या पिढीशी संवाद वाढवण्यापासून ते शेतकऱ्यांशी संवाद साधण्यापर्यंत राहुल गांधी यांनी आपल्या प्रतिमेत आणखी बदल घडवून आणला आहे. त्याचा परिणाम त्यांच्या समाजमाध्यमांवरील लोकप्रियतेतही दिसून आला आहे. अलीकडील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी गोळीबाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीतील पोलीस ठाण्यात अचानक ठिय्या आंदोलन केले होते. त्यांच्या या कृतीतून त्यांची अधिक आक्रमक राजकीय प्रतिमा समोर आली.
तिसऱ्या क्रमांकावर आपल्या चित्रपटांमधील दमदार प्रवेशासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता आणि राजकीय नेता विजय आहे. मात्र, आता राजकारणातील नेतृत्वाच्या मैदानातही विजयने दमदार प्रवेश केला आहे. सर्वेक्षणातील ९.२ टक्के लोकांनी विजय यांना भारताच्या पुढील पंतप्रधानपदासाठी पसंती दिली.
विशेष म्हणजे, राजकारणात येऊन अवघे साडेतीन महिने झाले असतानाही विजय यांनी देशभरात आपली छाप निर्माण केल्याचे सर्वेक्षणातून दिसते.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पुढील पंतप्रधानपदासाठी चौथ्या क्रमांकाच्या पसंतीच्या उमेदवार ठरल्या आहेत. त्यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचा क्रमांक आहे.
विशेष म्हणजे, सर्वेक्षणातील १.३ टक्के लोकांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांना पुढील पंतप्रधानपदासाठी योग्य मानले आहे. या आकडेवारीनुसार ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षाही पुढे आहेत. केजरीवाल यांना १.२ टक्के मते मिळाली आहेत.
