घरराजकारणविरोधकांना काम उरले नाही म्हणून टीका

विरोधकांना काम उरले नाही म्हणून टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्यामुळे त्यांनी दौरा टाळला असाही आरोप होत आहे. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. विरोधकांना टीका करायचा अधिकार आहे. त्यांना काम उरलं नाही. आम्ही काम करणारे लोकं आहोत. त्यांना टीका करू द्या आम्ही काम करत आहोत असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

शिंदे गटातील काही आमदार गुवाहाटीला जाऊ शकलेले नाहीत. त्याबद्दल बोलताना मुख्यामंत्री शिंदे यांनी काही आमदारांच्या मतदारसंघात निवडणुका आहेत. त्यामुळे ते या दौऱ्याला येऊ शकले नाहीत. त्यांनी तशी माझ्याकडे परवानगी घेतली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. कामाख्यादेवीच्या दर्शनासाठी गुवाहातामध्ये दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आम्ही देवीचे भक्त आहोत. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. कामाख्या देवी कडक आणि जागृत आहे. याची परिचिती सर्वांना आलीच असेल. त्यामुळे विरोधकांनी जपून बोलावं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लगावला आहे. कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात. हे आमदार गुवाहाटीला कशाला चाललेत? अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यांचे नाव न घेता शिंदे यांनी टोला लगावला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या निमंत्रणामुळेच आम्ही गुवाहाटीला आल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले

हे ही वाचा:

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसह आज गुवाहाटीला पोहोचले त्यावेळी आसाम सरकारने रेड कार्पेट अंथरून सर्वांचे जंगी स्वागत केले. आ सामचा पारंपारिक गमछा आणि आसामी टोपी देऊन सर्वांचं यावेळी स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आसाम सरकारने आमचं स्वागत केलं. याचा आनंद आहे. समाधान आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा येण्याची संधी मिळाली. आजच आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहोत. कामाख्या देवी कडक आणि जागृत आहे. त्याची प्रचिती आम्हाला आली आहे. सरकार स्थापन झालं. सर्व सामान्य लोकांच्या मनातील सरकार स्थापन झालं. विरोधकांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version