घरराजकारणमतांची चोरी झालेली नाही, राहुल गांधींच्या डोक्याची चीप गेली आहे!

मतांची चोरी झालेली नाही, राहुल गांधींच्या डोक्याची चीप गेली आहे!

फडनवीसांची राहुल गांधींवर सडकून टीका

“मला वाटतं मतांची चोरी महाराष्ट्रातही झाली नाही आणि भारतातही झालेली नाही. काही चोरीला गेलंच असेल तर राहुल गांधींच्या डोक्याची चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी रोज बोलतात. राहुल गांधी खोटं बोलतात आणि पळून जातात, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकातील मतदारसंघात एक लाख मतांची चोरी कशी झाली, निवडणूक आयोगाने कशी भाजपासह तडजोड केली असे आरोप केले. त्यावर फडणवीस बोलत होते.

हे ही वाचा:

शशिकांत चौथाईवाले यांच्या ‘माझी प्रचारक यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन

‘सायरा’साठी अनीत पड्डा यांना मिळतेय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम

उपराष्ट्रपती निवडण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदी आणि नड्डा यांच्यावर!

भारताबाबत हे भाकीत तर बाबा वेंगा पेक्षा भारी…

फडणवीस म्हणाले, राहुल गांधी दरवेळी वेगळी आकडेवारी देतात. मागच्या वेळी सांगितलं महाराष्ट्रात ७५ लाख मतदार वाढले. आता सांगितलं एक कोटी मतदार वाढले. दरवेळी काहीतरी नवं सांगून सनसनाटी आरोप करण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधींना कळलं आहे की त्यांच्या पायाखालची जमीन निसटली आहे. बिहारमध्येही त्यांना निवडून येता येणार नाही त्यामुळे राहुल गांधी कव्हर फायरिंग करत आहेत. अशा प्रकारचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे.”

फडणवीस म्हणाले, माझा राहुल गांधींना प्रश्न आहे की तुम्हाला जर मतदार याद्यांमध्ये घोळ दिसतो ना? निवडणूक आयोगाने बिहारमधल्या मतदारांचं काँप्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरु केलंय तर त्याला तुम्ही (राहुल गांधी) विरोध का करता? मी तर २०१२ मध्ये मागणी केली होती. एकीकडे असा विरोध करायचा आणि दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत असं म्हणायचं. एक प्रकारे भारताच्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, भारतात अराजक तयार झालं पाहिजे अशी मानसिकता राहुल गांधी यांची दिसते आहे. कारण त्यांना त्यांच्या पक्षाचं भविष्य दिसत नाहीये.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version