घरविशेषशशिकांत चौथाईवाले यांच्या 'माझी प्रचारक यात्रा' पुस्तकाचे प्रकाशन

शशिकांत चौथाईवाले यांच्या ‘माझी प्रचारक यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुण्यात होणार कार्यक्रम

- Advertisement -

माय होम इंडिया आणि भारतीय विचार साधना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी प्रचारक यात्रा‘ ! (मूळ हिंदी) लेखक: श्री शशिकांत चौथाईवाले यांच्या संघ प्रचारकांच्या सुमधुर व प्रेरणादायी आठवणींच्या संग्रहाचा प्रकाशन कार्यक्रम होत आहे.
या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर प्रभात प्रकाशन, दिल्ली यांनी केले आहे. १२ ऑगस्टला हा प्रकाशन सोहळा पुण्यात होणार आहे.

पुण्यामध्ये या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन आणि मराठी अनुवादाचे पुनर्प्रकाशन केले जाणार आहे. (प्रकाशक: भारतीय विचार साधना, पुणे) शशिकांत चौथाईवाले उपाख्य शशीजी १९६४ मध्ये पूर्वांचलात, तेव्हाच्या आसाम प्रांतात, संघाचे प्रचारक म्हणून गेले. तेव्हापासून आजतागायत गेली ६१ वर्षे ते आसाम मध्येच कार्यरत आहेत. १४ ऑगस्ट रोजी आदरणीय शशीजींच्या वयाला ८८ वर्षे पूर्ण होतील. त्यांच्या अभिष्टचिंतनाचा ही तो सोहळा असेल, असे माय होम इंडियाचे सुनील देवधर यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

उपराष्ट्रपती निवडण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदी आणि नड्डा यांच्यावर!

पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर!

कॅन्सरसारख्या रोगांपासून संरक्षण देणारी सुंठ !

राहुल गांधी यांचा ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रश्न उपस्थित करणे दुर्दैवी

सदर कार्यक्रम मंगळवार १२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. लेडी रमाबाई हॉल, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. भैय्याजी जोशी रा स्व संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य यांच्या हस्ते सुमंत आमशेकर पश्चिम क्षेत्र प्रचारक यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version