घरराजकारणगणेश खणकरांची भाजप गटनेतेपदी वर्णी

गणेश खणकरांची भाजप गटनेतेपदी वर्णी

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केले स्वागत

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सोमवार, २ फेब्रुवारी रोजी भाजप- शिवसेनेच्या नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाली. तत्पूर्वी भाजपने महापालिकेत आपला गटनेता निवडला आहे. गणेश खणकर यांची गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. यानंतर आता महापौरपदी आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष असणार आहे.

निवडणुकीनंतर दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर, भाजपने अखेर आपला गटनेता नियुक्त केला आहे. गणेश खणकर यांची भाजपचे नवे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने महानगरपालिकेत बहुमत मिळवल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत, भाजप स्वबळावर ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.

हे ही वाचा:

कोलकात्यातील रेस्तराँकडून गोमांस दिल्याची कबुली, मागितली माफी

गाझा- इजिप्तमधील रफाह क्रॉसिंग अंशतः उघडले

‘क्रिटिकल मिनरल्स’ परिषदेसाठी एस जयशंकर अमेरिकेला रवाना

मेडिटेशनवरील ऑडिओबुकसाठी दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार

गणेश खणकर हे दहिसरमधील प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आले आणि त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार सौरभ घोसाळकर यांचा पराभव केला होता. मुंबईतही आता भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याने, खणकर हे सभागृह नेते म्हणून काम पाहतील. गणेश खणकर यांची गटनेतेपदी निवड झाली त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, हर हर महादेव अशी घोषणाबाजी केली. गेल्या अनेक वर्षांपासून गणेश खणकर हे भाजपत काम करत आहेत. एक निष्ठावंत मराठी कार्यकर्ता म्हणून खणकर यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांची पार्श्वभूमी आहे. उत्तर मुंबईचे ते रहिवासी असून भाजपचे महामंत्री राहिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version