घरराजकारणसांगलीतल्या जिहादीला फाशी द्या, घरावर बुलडोझर फिरवा!

सांगलीतल्या जिहादीला फाशी द्या, घरावर बुलडोझर फिरवा!

हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची संतप्त मागणी

कुपवाड मध्ये स्वातंत्र्यदिनी जिहादी फरीद शेख याने किरकोळ वादातून हिंदू मराठा समाजातील मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर या पती-पत्नीवर हातोड्याने व मटण कापण्याच्या सुरीने जीवघेणा हल्ला चढवल्यामुळे मनीषा केसरेकर या हिंदू महिलेचा जागीच मृत्यू झाला. मोहन केसरेकर हे सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणामुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंदू एकता आंदोलनाच्या व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिहादी फरीद शेख ला फाशीची शिक्षा द्या, त्याच्या घरावर बुलडोझर फिरवा, सरकारी वकिलाची नेमणूक करून फास्टट्रॅक कोर्टात केस चालवा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र संतप्त निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला.

हिंदू एकता आंदोलन व हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते त्याने वतीने जिल्हाधिकारी मैनांक घोष यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रमोद भोकरे यांना फोन करून केस फास्ट कोर्टात चालवण्याचे आदेश दिले.

हे ही वाचा:

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून प्रश्न सोडवा! राहुल गांधींचे सोरेन यांना पत्र

सांगलीत जिहादीचा हिंदू दांपत्यावर हातोडा, सुऱ्याने हल्ला, पत्नीचा मृत्यू

अरशदीप सिंह डांग ठरले रॉयल एअर फोर्सचे पहिले शीख फायटर पायलट

“मला कार्यमुक्त करा” शहजाद पूनावाला यांचा पुन्हा राजीनामा

यावेळी बोलताना माजी आमदार नितीन राजे शिंदे म्हणाले की, कुपवाड सांगली येथे हिंदू- मराठा दापत्यावर झालेल्या हल्ल्याचा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. आताच आम्ही निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी सरकारी वकिलाची नेमणूक करून केस फास्ट कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. आता त्या जिहादी फरीद शेख ने परवानगी न घेता बांधलेल्या घरावर बुलडोझर फिरवून घर जमीनदोस्त करा. अन्यथा हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्याचे घर जमीनदोस्त करतील.

यावेळी हिंदू एकता आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष पै. प्रदीप निकम, मनोज साळुंखे, दत्तात्रय भोकरे, अनिरुध्द कुंभार, रवींद्र वादवणे, सोमनाथ गोटखिंडे, गजानन माने, दिग्विजय शिंदे, अनिकेत कुंभार, प्रकाश निकम, दीपक मोडक, बाळासाहेब मोहिते, शिवाजी पाटील, राम काळे, सविता मदने, कृष्णा नायडू, शुभम खोत, विनायक ठोंबरे, गोपाराव माने जालिंदर पारणे, गजानन कोळेकर, संजय पाटील, संभाजी जाधव, सागर पोद्दार, भरत माने, अमर पाटील, के.जी.पाटील, राजाराम नेलवे, महेश साळुंखे, रमेश जाधव, बाजीराव पायमल आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version