घरराजकारण‘उद्धव ठाकरे, हिंमत असेल तर अनिल परबांचा रिसॉर्ट वाचवून दाखवा’

‘उद्धव ठाकरे, हिंमत असेल तर अनिल परबांचा रिसॉर्ट वाचवून दाखवा’

ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट पाडण्यासाठी म्हणून भाजपा नेते किरीट सोमय्या हे दापोलीत दाखल झाले आहे. दापोलीतून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“दिवाळीत आल्यावर दापोलीकरांना वचन दिलं होतं की, अनिल परब यांची माफियागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही. हे समजतात काय स्वत:ला. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तुटला आता अनिल परबचा रिसॉर्ट तोडणार,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो. तुमच्यात हिंमत असेल तर अनिल परब यांचा रिसॉर्ट वाचवून दाखवा. मी तोडून दाखवणारच,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस थोड्या स्पष्ट, स्वच्छ, अलंकारिक भाषेत उत्तर देतात. पण मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, तुमच्या सांगण्यावरुन तुम्हाला अटक होणार नाही. तुमचा भ्रष्टाचार समोर आला की तुम्हाला सांगण्याचीही गरज भासणार नाही. तुमच्याविरोधात कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

“सचिन वाझेपासून प्रदीप शर्मा सगळे सुपारीबाज… आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं ना खाऊंगा ना खाने दुंगा. महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. नाटकं काय करतात, पोलिस नोटीस देतात. पोलिस काय सांगतात तर रिसॉर्ट तुटल्यावर बेरोजगारी निर्माण होईल. मोदी सरकारने दापोली कोर्टात अनिल परब विरोधात फौजदारी कारवाई करावी असे अपील केले आहे. पोलिसांना बळीचा बकरा काय करताय,” अशी घाणाघाती टीका किरीट सोमय्या यांनी केली.

हे ही वाचा:

ढोंग, लबाडीची ‘केजरीवाल फाइल्स’

….म्हणून मध्य प्रदेशचे गृहमंत्री मिश्रा झोमॅटो कंपनीवर भडकले

ताफा अडवून किरीट सोमय्यांना खेड पोलिसांची नोटीस 

मुख्यमंत्री गुड गोइंग ते बॅड गोइंग

“हा प्रतिकात्मक हातोडा अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी आणलाय पण, ठाकरे सरकारचा एक एक भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. सुप्रिया सुळे बसून सांगतात किरीट सोमय्याला कसं कळतं कुणावर कारवाई… तर ताईंना आज सांगतो पुढच्या आठवड्यात तिघांवर कारवाई होणार आहे,” असा गौप्यस्फोटही किरीट सोमय्या यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version