घरराजकारणशिक्षक मतदारसंघांत महायुतीचा विजय; पदवीधरांच्या तीनही जागा मविआकडे

शिक्षक मतदारसंघांत महायुतीचा विजय; पदवीधरांच्या तीनही जागा मविआकडे

विधान परिषद निकालाचे चित्र स्पष्ट

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांचे चित्र जवळपास ४५ तासांनी स्पष्ट झाले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन, तर महायुतीने दोन जागांवर विजय मिळवला. नागपूर आणि पुणे पदवीधर तसेच छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात मविआच्या उमेदवारांनी बाजी मारली. दुसरीकडे, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले, तर अमरावती शिक्षक निवडणुकीत शिवसेनेच्या किरण सरनाईकांचा विजय झाला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांनी विजय मिळवला आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्यासह अन्य प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या निकालामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला १८ वर्षांनंतर विजय मिळाल्याचे वृत्त आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव केला. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर सरनाईक यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. वंजारी यांना ६७ हजार २३१, तर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. नागपूर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने भाजपसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरला. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव केला. हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख १३ हजार ८४० मते मिळाली. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी विजय मिळवला.

हे ही वाचा:

भारताच्या दहशतवादविरोधी रणनीती युद्धसिद्ध!

‘JAI’च्या माध्यमातून हिंद-प्रशांतमध्ये सामरिक समीकरणांना बळ

संजय राऊत, निखिल वागळे हाजिर हो!

कोकण रेल्वेच्या संचालक (वित्त)पदी कविता राकेश साटवी यांची नियुक्ती

२७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे अंतिम निकाल घोषित होईपर्यंत सलग ४५ तासांहून अधिक काळ सुरू होती. मतपत्रिकांची पडताळणी, वर्गीकरण, पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी, उमेदवारांची वगळणी, पुढील पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरण, अंतिम आकडेवारीची तपासणी व निकाल निश्चिती या प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version