घरक्राईमनामामृत्यूपूर्वी मनसुख हिरेन यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मृत्यूपूर्वी मनसुख हिरेन यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, ज्याचा तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे. दरम्यान या मनसुख हिरेन यांनी २ मार्चला पत्र लिहिले होते. मृत्यूपूर्वी मनसुख हिरेन यांनी पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र माध्यमांकडून समोर आलं आहे. पीडित असूनही आरोपीसारखी वागणूक मिळत असल्याची खंत हिरेन यांनी पत्रातून मांडली आहे.

“कार चोरीप्रकरणी तेच तेच प्रश्न विचारुन वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी मानसिक छळ केल्याचा दावा हिरेन मनसुख यांनी केला आहे. पीडित असूनही चौकशीत आरोपीसारखी वागणूक मिळत आहे. तसेच माध्यम प्रतिनिधींकडूनही फोन करून विनाकारण मानसिक छळ केला जात आहे. कार चोरणाऱ्या गुन्हेगाराबाबत माहिती नाही, तरीही माझा छळ केला जात आहे. कार चोरीला गेल्याबद्दल जबाब दिला, तरी छळ सहन करावा लागतोय.” असे ते आपल्या पत्रात म्हणाले.

हे ही वाचा:

“माझे पती आत्महत्येचा विचारही करू शकत नाहीत” – विमला हिरेन

कांदिवलीहून क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता. मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत. ते आत्महत्या करु शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमना हिरेन यांनी दिली. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं, असंही त्या म्हणाला. विमला हिरेन यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान ही प्रतिक्रिया दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version