घरराजकारणमिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम

शिंदे फडणवीस सरकराने महाविकास आघाडीमधील बड्या नेत्यांची सुरक्षा कपात केली आहे. ठाकरे आणि पवार कुटुंब वगळता इतर पंधरा बड्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. परंतु मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. नार्वेकर यांना आधी एक्स प्लस सुरक्षा होती. मात्र, आता त्यांना वाय प्लस आणि एक्सकॉर्ट देण्यात आले आहे. महाविकास आघाडीमधील पंधरा बड्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. यामध्ये वरुण सरदेसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनिल केदारे तसेच डेलकर कुटुंबिय यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी

एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी

राज्यात बसणार सायबर गुन्ह्यांना आळा

आता वैद्यकीय शिक्षण घेता येणार मराठीत

यासोबतच पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले संजय राऊत, शंभर कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी कारागृहात असलेले अनिल देशमुख आणि मनी लॉड्रींग प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले नवाब मलिक या तिघांची सुरक्षा काढली आहे. पण मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर ठाकरे, पवार कुटुंबियांची सुरक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version