घरराजकारणमतपत्रिकेवरील निवडणुकीतही काँग्रेसचा सुपडा साफ, सिलचरमध्ये एनडीएचा दबदबा

मतपत्रिकेवरील निवडणुकीतही काँग्रेसचा सुपडा साफ, सिलचरमध्ये एनडीएचा दबदबा

पहिल्याच निवडणुकीत ४२ पैकी ३४ जागा एनडीएने जिंकल्या

आपल्या पराभवाचे खापर सातत्याने ईव्हीएमवर फोडणाऱ्या आणि सगळ्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसला सिलचरमध्ये मतपत्रिकांवर घेण्यात आलेल्या पालिका निवडणुकीत चांगलाच दणका बसला. आसाममधील सिलचर महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मोठे यश मिळाले आहे. एकूण ४२ प्रभागांपैकी एनडीएने तब्बल ३४ जागांवर विजय मिळवला. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्या, तर सहा जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

सिलचर महानगरपालिकेसाठी ३ ऑक्टोबर रोजी ४२ पैकी ४० प्रभागांमध्ये मतदान झाले होते. भाजपचे बिजेंद्र प्रसाद सिंह आणि भक्ती सेन तालुकदार हे अनुक्रमे प्रभाग क्रमांक ९ आणि २० मधून बिनविरोध विजयी झाले होते. दरम्यान, निकालानंतर भाजपने दोन प्रभागांमध्ये फेरमतमोजणीची मागणी केली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक २९, जिथे अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे, आणि प्रभाग क्रमांक ३०, जिथे काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे, यांचा समावेश आहे. भाजपच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘रामायण’च्या व्हिएफएक्स कंपनीवर आयकर विभागाची धाड

भारतीय अर्थव्यवस्थेला आरबीआयचा मोठा बूस्टर

मुख्यमंत्री ते पंतप्रधान… मोदींच्या कारकिर्दीचा २५ वर्षांचा सुवर्णकाळ

देशासमोर सत्ता, पद, प्रतिष्ठा काहीही मोठे नाही!

निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यात आला होता. निकालानंतर आसाम भाजपचे अध्यक्ष दिलीप सैकिया यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मतपत्रिकेद्वारे निवडणूक होऊनही काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळवता आलेला नाही. सैकिया म्हणाले, “काँग्रेस नेहमी ईव्हीएममध्ये छेडछाडीची तक्रार करते. मात्र ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे झाली आणि तरीही काँग्रेस कुठेच दिसत नाही.”

सिलचरमधील या निकालाला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विकासाच्या अजेंड्याला मिळालेला मोठा जनादेश असल्याचे म्हटले. या निकालातून दोन्ही नेत्यांच्या विकासाच्या राजकारणावर जनतेचा विश्वास दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला.

या निवडणुकीत एकूण १३३ उमेदवार रिंगणात होते. भाजपने ३८ प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले होते, तर त्यांचा मित्रपक्ष आसाम गण परिषद (एजीपी)ने चार प्रभागांत निवडणूक लढवली. काँग्रेसने ३८ प्रभागांमध्ये उमेदवार दिले होते. याशिवाय ५२ अपक्ष उमेदवार आणि एक माकप उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होता.

सहा वर्षांनंतर सिलचरला मिळाले महापालिका स्वरूप

सिलचर नगर मंडळाचे २०२२ मध्ये ४२ प्रभागांच्या महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आले. मात्र ही महानगरपालिका प्रत्यक्षात जून २०२५ मध्ये कार्यरत झाली. त्यामुळे बराक खोऱ्याचे प्रमुख शहर असलेल्या सिलचरमध्ये तब्बल सहा वर्षे नियमित नागरी संस्था अस्तित्वात नव्हती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version