घरराजकारणराहुल गांधीमधे संचारला सलमान

राहुल गांधीमधे संचारला सलमान

काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी हे कायमच आपल्या अतरंगी कारामतींमुळे माध्यमांत चर्चेत असतात. कधी ते लोकसभेत मिठी आणि डोळा मारतात तर कधी मासे पकडायला पाण्यात उडी मारतात. आजही ते अशाच काहीशा गोष्टींमुळे पुन्हा चर्चेत आले. तामिळनाडू मध्ये राहुल गांधी हे नाचताना आणि ‘पुश अप्स’ मारताना दिसून आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज तामिळनाडूमधे कन्याकुमारी जिल्ह्यातील सेंट जोसेफ शाळेत गेले होते. या शाळेतील एका विद्यर्थिनीने राहुल गांधी यांच्यासमोर एक नृत्य सादर केले. त्यानंतर तिने गांधी यांना आपल्यासोबत नाचण्याची विनंती केली. या विनंतीनंतर राहुल गांधी त्या विद्यार्थिनी सोबत ठेका धरताना दिसले. त्यांनी आपले सहकारी तामिळनाडूचे प्रभारी दिनेश गुंडू राव आणि तामिळनाडूचे काँग्रेस अध्यक्ष के.एस.अल्गीरी यांनाही आपल्यासोबत नाचायला लावले.

या कार्यक्रमात राहुल गांधी हे ‘अकिडो’ हा जपानी ‘मार्शल आर्टस्’ प्रकार करताना दिसून आले. नंतर त्यांनी याच शाळेच्या एका विद्यार्थिनीसोबत ‘पुश अप चॅलेंज’ ही केले. राहुल गांधींचे हे नाचतानाचे आणि ‘पुश अप’ करतानाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले असून यावरून राहुल गांधींना ट्रोल करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version