घरक्राईमनामाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

राज्यात महिला अत्याचाराचा प्रश दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत असून राज्यातील सत्ताधारी पक्षांशी संबंधित लोक या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे चित्र आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नगरसेवकाच्या मुला विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही घटना घडली असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर बंडुतात्या गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी राष्ट्रवादी नगरसेवकाचा मुलगा आहे. पीडित महिला ही मुंढवा परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करत असे. आरोपीची आणि पीडितेची भाजी खरेदीच्या निमित्ताने भेट होत होती. एक दिवस आरोपीने ही पीडित महिला घरी एकटी असल्याचे पाहून तिच्या अंगावर हात टाकला.

हे ही वाचा:

बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?

राजेश टोपेंना मिळणार ‘घोटाळेरत्न’ पुरस्कार

रणझुंजार नव्हे तर घरझुंजार! अतुल भातखळकर यांची टोलेबाजी

‘ठाकरे सरकारचा राज्यकारभाराचा पोरखेळ’

महिलेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने महिलेवर बलात्कार केला. भीतीपोटी या महिलेने हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. त्यानंतर हा आरोपी वारंवार महिलेवर बलात्कार करत राहिला. तब्बल दीड वर्ष हा प्रकार सुरु होता. १७ डिसेंबर रोजी या आरोपीने महिलेवर बलात्कार केला तेव्हा पीडितेच्या पतीने आरोपीला रांगेहात पकडले. त्यानंतर हा सारा प्रकार समोर आला.

या प्रकरणी पीडित महिलेने स्थानिक पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवली असून पोलिसांनी आरोपी समीर गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात आपल्या मुलाला अडकवले जात असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील उर्फ बंडू तात्या गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनी देखील या प्रकरणात ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागितल्याची फिर्याद नोंदवली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version