घरराजकारणअबू आझमीनंतर संजय निरुपम यांचाही ठाकरे सरकारवर हल्लाबोल

अबू आझमीनंतर संजय निरुपम यांचाही ठाकरे सरकारवर हल्लाबोल

बाबरी मशीदीवरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये वादंग सुरु झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. काँग्रेस पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी देखील आता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील वक्तव्यावरुन एक ट्वीट केलं आहे. त्यात “महाराष्टाच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी मस्जिदच्या विध्वंसाचा उदोउदो केला आणि तिथे उपस्थित असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदार भाषणाचा आनंद घेत होते. हा कोणत्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग आहे? ओवेसी यांनी लावलेल्या विषारी रोपट्याच्या वाढीसाठी यात पुरेसं खतपाणी नाही का?”, असा सवाल निरुपम यांनी केलाय.

हे ही वाचा:

अबू आझमींनी उद्धव ठाकरेंना फटकारले

उद्धव ठाकरे यांनी काल (३ मार्च) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना, “बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे.” या बाळासाहेब ठाकरेंच्या वाक्याची आठवण करवून दिली. उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केल्यावर सरकारी पक्षाकडून या वाक्याचं समर्थन करण्यासासाठी बाकही वाजवले नाहीत. अपेक्षेप्रमाणे आता सरकारी पक्षांमधूनच या विरोधातले सूर उमटत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version