घरराजकारण'संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?'

‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’

- Advertisement -

शिवसेनेच्या नेत्याकडूनच घरचा अहेर

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या एका माजी नेत्याने घाणाघाती टीका केली आहे. हिंगोलीचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमुळे शिवसेना उभी राहिली. शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांची आर्थिक स्थिती आजही बिकट आहे. मात्र, शिवसेनेचे नेते श्रीमंत झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

ईडीचा घोटाळा जरूर बाहेर काढा परंतु लोकसभा आणि राज्यसभेत जनतेचे प्रश्नही मांडा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बाहेरून मजा घेत आहेत. अजित पवारांशिवाय कोणीही या विषयावर भाष्य केलेले नाही. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कुणी किती कष्टाने कमाई केली आहे. कोण होते संजय राऊत, त्यांचा पगार किती होता? नारायण राणेंना शिवसेनेचे मुख्यमंत्री केले तेव्हा ते काय धुतल्या तांदळासारखे होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार

‘दिशा सालियनला घरी आणण्यासाठी वापरलेली काळी मर्सिडीज सचिन वाझेची?’

‘लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकल प्रवासाचा निर्णय मागे घ्या!’

नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या रक्षणासाठी जीवाचीही पर्वा केली नाही, हे शिवसेना विसरली आहे का? मुंबईत शिवसेना मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये नारायण राणे यांचा समावेश होता. शिवसेनेला नारायण राणेंचे उपकार विसरले आहे का? दत्ता सामंत यांची हत्या कोणी केली आणि गुन्हा करण्यास कोणी मदत केली, हे लवकरच कळेल. ‘ज्यांनी मुंबई वाचवली ते आपापसात भांडत आहेत आणि ते कसे संपतील याची काँग्रेस वाट पाहत आहे,’ असा टोला माजी शिवाजी माने यांनी शिवसेनेला लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version