घरराजकारण"'या' नेत्यांना भाजपात सामील व्हायचे आहे"- अधीर रंजन चौधरी

“‘या’ नेत्यांना भाजपात सामील व्हायचे आहे”- अधीर रंजन चौधरी

काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपताना दिसत नाहीये. लोकसभेतील काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेसच्या ‘जी-२३’ वर हल्ला केला आहे. “जे नेते आज सेक्युलरिजमबद्दल बोलत आहेत, त्यांनी आधीच स्वतःसाठी मूठभर मास काढले आहे.” असे त्यांनी सांगितले आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन आता काँग्रेसमध्येच मतमतांतरे निर्माण होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी या आघाडीवर प्रश्न उपस्थित करताना पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना प्रश्न विचारला आहे. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डावे पक्ष, काँग्रेस आणि आयएसएफने आघाडी केली आहे. मात्र, पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील आयएसएफ आणि काँग्रेसमध्ये फार काही सख्य नाही.

हे ही वाचा:

काँग्रेसमध्ये आता आनंद शर्मा विरुद्ध अधीर रंजन चौधरी?

जम्मूमध्ये गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांची बैठक झाली होती. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींची स्तुतीही केली होती. अधीर रंजन चौधरी यांनी या सर्व प्रकरणावर, या नेत्यांना भाजपामध्ये सामील व्हायचे आहे असे विधान केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version