घरराजकारणहल्द्वानीतील ‘शुद्धीकरण’ प्रकरणात अखेर एफआयआर

हल्द्वानीतील ‘शुद्धीकरण’ प्रकरणात अखेर एफआयआर

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर झालेल्या कथित ‘शुद्धीकरण’ प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळालं आहे. रामलीला मैदानात ८ ऑगस्ट रोजी खरगे यांची सभा झाली होती. त्यानंतर १० ऑगस्टला याच मैदानात काही जणांनी कथित शुद्धीकरणाची विधी केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेवरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत जातीय भेदभाव आणि सामाजिक अपमानाचा आरोप केला होता.

या प्रकरणी हल्द्वानी कोतवाली पोलिसांनी अखेर अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. वकील अंजू यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६ आणि २९९ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(आर) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीत अनुसूचित जातीतील व्यक्तीचा सामाजिक अपमान, जातीय भेदभाव आणि तिरस्काराची भावना निर्माण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हल्द्वानीचे एसपी क्राइम डॉ. जगदीश चंद्र करणार आहेत.
हे ही वाचा:
अवघ्या ११ दिवसांत मोदी-पुतिन पुन्हा आमनेसामने; शुक्रवारी द्विपक्षीय भेट

सेन्सेक्स ५५५ अंकांनी कोसळला

सुरत बनतंय देशाचं नवं ‘स्पेंडिंग हब’

‘झूठ की गूँज’ कितीही मोठी असेल, पण तरुण ऐकणार सत्याचा आवाज!

या घटनेवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेतही आवाज उठवला होता. दोषींविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनीही हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित कथित व्हिडिओंचीही पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. व्हिडिओमध्ये छेडछाड झाली आहे का किंवा एआयच्या माध्यमातून बनावट व्हिडिओ तयार करून पसरवण्यात आला आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी या प्रकरणात बंगळुरूमध्येही ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात आली होती. त्यामुळे हल्द्वानीतील कथित शुद्धीकरणाचा मुद्दा आता उत्तराखंडच्या राजकारणासोबतच राष्ट्रीय राजकारणातही चर्चेचा विषय बनला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version