घरबिजनेससेन्सेक्स ५५५ अंकांनी कोसळला

सेन्सेक्स ५५५ अंकांनी कोसळला

गुंतवणूकदारांचे ४८ हजार कोटींचे नुकसान

भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवारचा दिवस पुन्हा एकदा निराशाजनक ठरला. सलग सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स ५५५.२३ अंकांनी घसरून ७५ हजार ५७७.५८ अंकांवर, तर निफ्टी १४४.०५ अंकांनी घसरून २३ हजार ६३२.१० अंकांवर बंद झाला. निफ्टीने २३ हजार ६५०ची महत्त्वाची पातळीही गमावल्याने बाजारातील नकारात्मक वातावरण आणखी गडद झाले. या घसरणीचा थेट फटका गुंतवणूकदारांना बसला असून, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यात सुमारे ४८ हजार ६८ कोटी रुपयांची घट झाली.

बाजारातील या घसरणीमागे सर्वात मोठे कारण ठरले ते म्हणजे पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि त्याचा कच्च्या तेलाच्या किमतींवर झालेला परिणाम. ब्रेंट क्रूडचा भाव सुमारे ९७ ते ९८ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे ८५ टक्के तेल आयात करत असल्याने कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई, उत्पादन खर्च आणि कंपन्यांच्या नफ्यावर दबाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
हे ही वाचा:
सुरत बनतंय देशाचं नवं ‘स्पेंडिंग हब’

‘झूठ की गूँज’ कितीही मोठी असेल, पण तरुण ऐकणार सत्याचा आवाज!

‘सर तन से जुदा’ ची तुलना ‘जय श्री राम’ घोषणेशी होऊ शकत नाही!

काँग्रेसचा पचका; हल्दवानी ‘शुद्धीकरण’ प्रकरणाची याचिका काढली निकाली

यासोबतच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबतची अनिश्चितता, आयटी शेअर्समधील विक्री आणि बाजारात सुरू असलेली मोठी आयपीओची लगबग यामुळेही गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झाला. मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांसारख्या प्रमुख समभागांमध्ये कमजोरी राहिली.

दरम्यान, बाजारातील घसरणीचा कल तातडीने बदलण्याची चिन्हे अद्याप स्पष्ट नाहीत. तज्ज्ञांच्या मते, निफ्टीसाठी २३ हजार ६५०च्या आसपासची पातळी महत्त्वाची आहे. ही पातळी टिकली नाही, तर बाजारात आणखी दबाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील सत्रांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती, पश्चिम आशियातील परिस्थिती, जागतिक बाजारांचे संकेत आणि फेडच्या व्याजदरासंदर्भातील निर्णय याकडे गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version