घरराजकारण'झूठ की गूँज' कितीही मोठी असेल, पण तरुण ऐकणार सत्याचा आवाज!

‘झूठ की गूँज’ कितीही मोठी असेल, पण तरुण ऐकणार सत्याचा आवाज!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना टोला

भारतातील तरुणांचा आवाज आणि त्यांच्या आकांक्षा ‘खोट्याच्या प्रतिध्वनी’वर मात करतील “तुम्हाला प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर असे लोक दिसतील, जे तुम्हाला ‘खोट्याच्या प्रतिध्वनी’ने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. मात्र भारतातील तरुण सत्याच्या बुलंद हाकेतून प्रेरणा घेऊन पुढे जातात. ते त्या हाकेसोबत वाटचाल करतात आणि सत्यासाठी प्रयत्न करतात, वडोदरा येथे आयोजित ‘नमो फॉर विकसित भारत’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या अंतिम तीन टप्प्यांचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचा उल्लेख करताना गेल्या १२ वर्षांत देशाच्या कार्यसंस्कृतीत मोठा बदल झाल्याचा दावा त्यांनी केला. पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेतील न्यू साणंद (उत्तर)-न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव-न्यू सफाळे आणि न्यू सफाळे-न्यू जवाहरलाल नेहरू बंदर हे तीन टप्पे एकूण ३२६ किलोमीटरचे आहेत. त्यासाठी २० हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. गुजरात दौऱ्यात पंतप्रधानांनी ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण तसेच भूमिपूजन केले.

समर्पित मालवाहतूक मार्गिकेचा संदर्भ देत मोदी यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, या प्रकल्पाची संकल्पना २००४ मध्ये मांडण्यात आली होती आणि २००६ मध्ये त्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली. मात्र २०१४ पर्यंत प्रकल्पाच्या फायली केवळ एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरत राहिल्या. विचित्र बाब म्हणजे या फायलींनाही समर्पित मार्गिकेचा लाभ मिळाला नाही, असा टोला मोदी यांनी विरोधकांना लगावला.

मोदी यांनी आपल्या भाषणात देशातील तरुणांवर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर विशेष भर दिला. भारतातील ‘झेड’ आणि ‘अल्फा’ पिढीला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगासाठी तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य केवळ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रापुरते मर्यादित राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य क्षेत्रात नवीन उपाय विकसित करणे, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवणे तसेच रोबोटिक्सवर आधारित नव्या उद्योगांची उभारणी करण्यासाठी विविध क्षेत्रातील तरुण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतात, असे मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

मेट्रो सिनेमाजवळ १०.६४ लाखांच्या बनावट नोटा जप्त

रिलायन्सची बॉन्ड बाजारात दमदार वापसी

युरोपच्या डिझेल बाजारात भारताचा दबदबा

दिल्लीतील पीजी दुर्घटनेतील अर्पितच्या डोळ्यांनी दुसऱ्याला मिळणार दृष्टी

“भारत आणि जगातील उद्योगांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेणारे आणि तिचा प्रभावी वापर करू शकणारे तरुण आवश्यक आहेत. सरकार या दिशेने मोठी मोहीम सुरू करणार आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.

देशातील घरांच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांचाही मोदी यांनी उल्लेख केला. देशभरात ५५ लाख कुटुंबांनी सौरऊर्जा प्रकल्प बसवले असून, त्यापैकी ११ लाख कुटुंबे गुजरातमधील असल्याचे त्यांनी सांगितले. “अनेक कुटुंबे आता वीज ग्राहक राहिलेली नाहीत, तर वीज उत्पादक बनली आहेत. त्यामुळे उत्पादन, बसवणी आणि देखभालीपासून अनेक क्षेत्रांत तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. तसेच अनेक नवीन विक्रेते आणि सेवा पुरवठादारही निर्माण झाले आहेत,” असे मोदी म्हणाले.

भारताच्या उत्पादन क्षेत्राबाबत बोलताना मोदी यांनी देश आता ‘चिपपासून जहाजापर्यंत’ नवा अध्याय लिहित असल्याचे सांगितले. स्वावलंबन मजबूत करण्यासाठी देशांतर्गत पुरवठा साखळी विकसित केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताने सौरऊर्जा घटकांच्या उत्पादनासाठी २०० गिगावॅटपेक्षा अधिक देशांतर्गत क्षमता विकसित केली असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version