घरस्पोर्ट्सटी-२० रँकिंगमध्ये श्री चरणी अव्वल कायम

टी-२० रँकिंगमध्ये श्री चरणी अव्वल कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जाहीर केलेल्या महिला टी-२० गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताची डावखुरी फिरकीपटू श्री चरणीने अव्वल स्थान कायम राखले आहे. अनुभवी भारतीय फिरकीपटू दीप्ती शर्माला दोन स्थानांचा फायदा झाला असून ती आता सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे.

ताज्या क्रमवारीत श्री चरणी पहिल्या स्थानावर असून इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन दुसऱ्या, चार्ली डीन तिसऱ्या, दक्षिण आफ्रिकेची एन मल्बा चौथ्या आणि इंग्लंडची लॉरेन बेल पाचव्या क्रमांकावर आहे.

दीप्ती शर्माने दोन स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले आहे. सध्या सुरू असलेल्या महिला आशिया कपमध्ये दीप्तीची कामगिरी प्रभावी ठरली आहे. तिने आतापर्यंत तीन सामन्यांत आठ विकेट्स घेतल्या असून भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करण्यात तिची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

इंग्लंडची लिंसे स्मिथ एका स्थानाच्या घसरणीसह सातव्या, तर पाकिस्तानची नशरा संधू एका स्थानाच्या घसरणीसह आठव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेची मारिजाने काप एका स्थानाच्या सुधारणेसह नवव्या क्रमांकावर पोहोचली आहे. पाकिस्तानची सादिया इक्बाल एका स्थानाच्या घसरणीसह दहाव्या क्रमांकावर आहे.

आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अन्य काही गोलंदाजांनाही क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. बांगलादेशची मारूफा अख्तरने तब्बल १९ स्थानांची झेप घेत १८वे स्थान मिळवले आहे. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू पाच स्थानांनी वर चढून २८व्या क्रमांकावर पोहोचली आहे. सुलताना खातूनने नऊ स्थानांची झेप घेत ३७वे स्थान मिळवले आहे.

थायलंडची थिपाचा पुथावोंग चार स्थानांनी वर चढून ४७व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिची संघसहकारी सुलीपोर्न लाओमीने तब्बल १० स्थानांची झेप घेत ५३वे स्थान मिळवले आहे.

महिला टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत

ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी अव्वल स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया वॉल दुसऱ्या, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट तिसऱ्या, वेस्ट इंडिजची हिली मॅथ्यूज चौथ्या आणि भारताची स्मृती मंधाना पाचव्या क्रमांकावर आहे.

श्रीलंकेची चमारी अटापट्टू सहाव्या, भारताची शफाली वर्मा सातव्या, न्यूझीलंडची अमेलिया केर आठव्या, ऑस्ट्रेलियाची ताहिला मॅक्ग्रा नवव्या आणि भारताची हरमनप्रीत कौर दहाव्या क्रमांकावर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version