घरराजकारणउद्धव ठाकरेंची महायुती सरकारच्या सीबीआय चौकशीची मागणी

उद्धव ठाकरेंची महायुती सरकारच्या सीबीआय चौकशीची मागणी

नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरून टीका

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत सरकारवर टीका केली. करोनाच्या काळात सक्षमपणे लढा दिला. पण, सरकार बदललं आणि आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नांदेड शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणानंतर केली.

“एका गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले. ते डीन आदिवासी आहेत असं ते म्हणतात. कधीच जातपात पाहिली नाही. सर्वांना एकाच न्यायाने वागवलं. आहे. डीनला संडास साफ करायला लावल्यानंतर त्या गद्दारावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून डीनला धमकावण्यासाठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

सध्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेत, ते बघितल्या नंतर चीड येते. मविआ सरकार नाहीये. पण, आरोग्य व्यवस्था तीच आहे. करोना सारख्या संकटाचा सामना केला. त्याच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आज कोणताही सााथ नाही. फक्त भ्रष्टाचाराची साथ आहे. आरोग्य खात्यात रेट कार्ड ठरवलं जात आहे. निविदा प्रक्रिया बंद केली आहे. निविदा प्रक्रियेशिवाय औषध खरेदी केली जात असेल तर हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचारावर बोलणार. तुम्ही भ्रष्टाचाराचे दार उघडे करून देता. त्याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

गोव्यामध्ये टेबलवर नाचायला पैसे आहेत, गुवाहटीमध्ये मजामस्ती करायला पैसे आहेत, पण औषधासाठी पैसे नाहीत का? एक फूल दोन हाफ कुठे आहेत? सरकारकडे औषधांसाठी पैसे नाही म्हणता, पण परदेश दौरा सुरु आहे, जाहीरातबाजी करण्यासाठी सरकारकडे पैसे कुठून येतोय? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत नक्षलवाद विरोधात कसे लढायचे यासाठी गेले आहेत. ते पण महत्वाचं आहे. पण आता ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी जायला हवं. नांदेड मध्ये डीन वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त नांदेड मध्येच का? ठाण्यात देखील घटना घडली. मग तिथे का नाही कारवाई केली, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

औषधे खरेदी केली जात नाहीये. औषधांचा तुटवडा असल्याचं सांगितलं जात आहे. यामागे कोण आहे? कोरोना काळात औषधांचा तुटवडा नव्हता मग आता कसा तुटवडा पडतोय. सगळा भ्रष्टाचार सुरू आहे. औषधे खरेदी केली जात नाही आहेत. जो आरोग्यमंत्री हाफकीन कोण असं विचारतो त्याचबद्दल काय बोलणार, असंही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version