घरराजकारण"शरद पवारांना क्रिकेट आणि कुस्तीतलं काय कळतं?"- सदाभाऊ खोत

“शरद पवारांना क्रिकेट आणि कुस्तीतलं काय कळतं?”- सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकरी आंदोलनावरुन शरद पवार आणि आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधी क्रिकेट खेळले होते का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला दुसऱ्या क्षेत्राबद्दल बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावर सदाभाऊ खोत बोलत होते.

“सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं. असे विधान केलले हे ऐकून थोडा वेळ हसू आलं.” असे रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले. शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

“अनेक विषय असतात अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पध्दत काही लोकांनी राज्यात लावली आहे.” हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version