घरराजकारणमनोज जरांगेंच्या विरोधात महिला सहकारी पोलिस ठाण्यात

मनोज जरांगेंच्या विरोधात महिला सहकारी पोलिस ठाण्यात

जरांगेंच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीच्या चौकशीचीही मागणी

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, याची प्रचीती त्यांचा अंतरवाली सराटीतील तंबू गावकऱ्यांनी उखडल्यानंतर आलेली असताना आता जरांगेंच्या एक महिला सहकारीही त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत.

मनोज जरांगे आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा अवैध वाळू उत्खननाच्या व्यवहारांशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे. अजय बारस्कर यांनीही मध्यंतरी कंत्राटदारांच्या मुद्द्यांवरून जरांगेंवर आरोप केले होते. आंदोलनाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता जरांगे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खरेदी केल्याचेही त्यांनी आरोप करत म्हटले आहे. यादरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एका महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मनोज जरांगे यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. जरांगेंच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासूनसोबत असलेल्या महिलेनेच गंभीर आरोप केले.

मनोज जरांगे यांच्यासोबत आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनीच आता जरांगेंच्या विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. अंतरवाली सराटीतून जरांगे यांचा तंबू काढून टाकल्यानंतर तारख यांनी मीडियाशी बोलताना म्हटले होते की, आम्हाला या आंदोलनातून काहीही मिळाले नाही. गावातील लोकांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नाही.

हे ही वाचा:

गोल्डी ब्रार एफबीआयच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत

बंडखोरांच्या भागात म्यानमार लष्कराचा हवाई हल्ला

राहुल गांधींकडून कन्हैय्याकुमारची चंपी

थकलेले वाहतूक चलान वीज बिलात टाका!

आता तारख यांनी असा आरोप केला आहे की,  सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ, एआय निर्मित फोटो आणि व्हिडीओ बनवून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तारख यांनी मागणी केली की, २०२३ पासून जरांगे यांच्यासोबत असलेल्या माझ्यासह सर्व सहकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा. सोशल मीडियावर माझी बदनामी केली जात आहे. मी पैसे घेतले. लाखोचे पॅकेज घेतले. मला विचारले जात आहे की, तुम्ही किती प्लॉट घेतले? माझ्या संपत्तीची चाैकशी करा. त्यात कळेल की, कोणाच्या संपत्तीमध्ये वाढ झाली. ज्यावेळी वेळ येईल, त्यावेळी मी सत्य बोलेन.

मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरूवात केली. मुंबईच्या दिशेने ते रवाना देखील झाले. आझाद मैदानावर त्यांचे आंदोलन होणार होते. मात्र, आंदोलनाच्या २० व्या दिवशीच बीडच्या पाटोद्यातून त्यांनी उपोषणाला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. सरकारला तीन महिन्यांचा वेळ त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना आयकर खात्याने चाैकशीची नोटीस दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version