घरस्पोर्ट्सश्रीलंका मालिकेपूर्वी अफगाणिस्तानला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार

श्रीलंका मालिकेपूर्वी अफगाणिस्तानला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार

टी२० विश्वचषक २०२६ मध्ये अफगाणिस्तानचा प्रवास ‘सुपर-८’पूर्वीच संपुष्टात आला. या स्पर्धेनंतर जवळपास ४ वर्षे संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले जोनाथन ट्रॉट यांचा कार्यकाळही संपला आहे. आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी) नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे.

एसीबीने नव्या प्रशिक्षकासाठी एक महत्त्वाची अट घातली आहे. ऑफ-सीझन काळात मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने अफगाणिस्तानमध्येच कार्यरत राहावे, अशी बोर्डची अपेक्षा आहे. राष्ट्रीय संघातील खेळाडूंवर बारकाईने लक्ष ठेवून संघातील उणिवांवर काम करणे, हा त्यामागचा उद्देश आहे.

एसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसीब खान म्हणाले, “करारामध्ये आम्ही स्पष्ट केले आहे की प्रशिक्षकाचे कार्यस्थळ अफगाणिस्तान असेल. आंतरराष्ट्रीय मालिका नसताना त्यांनी राष्ट्रीय संघाच्या कमकुवत बाबींवर लक्ष केंद्रित करावे.”

ट्रॉट यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झाला असून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या व्हाईट-बॉल मालिकेपूर्वी नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली जाईल, असेही खान यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील दोन आणि एका आशियाई उमेदवाराचे नाव शॉर्टलिस्ट करण्यात आले असून त्यांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. मात्र, संभाव्य नावांचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.

जोनाथन ट्रॉट यांनी २०२२ मध्ये अफगाणिस्तान संघाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तानने उल्लेखनीय कामगिरी केली. वनडे विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका यांसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले. टी२० विश्वचषक २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. जरी यंदाच्या टी२० विश्वचषकात संघाला पुढे जाता आले नाही, तरी ट्रॉट यांचे योगदान टेस्ट, वनडे आणि टी२० या तिन्ही प्रकारांत महत्त्वपूर्ण राहिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version