घरस्पोर्ट्सहॉस्पिटलमध्ये गेल्यावरच कळलं – ही गंभीर दुखापत आहे...

हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच कळलं – ही गंभीर दुखापत आहे…

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर यांनी स्प्लीन (प्लीहा) दुखापतीबाबतचा अनुभव शेअर करताना ही दुखापत “अत्यंत वेदनादायक” असल्याचं सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फील्डिंग करताना अय्यर जखमी झाले होते. या दुखापतीमुळे त्यांना दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहावं लागलं.

स्प्लीन ही आपल्या शरीरातील एक महत्त्वाची अवयव आहे, याची जाणीव त्यांना प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरच झाली, असं अय्यर यांनी स्पष्ट केलं.

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावरच कळली गंभीरता

राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियम येथे न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडेपूर्वी ब्रॉडकास्टर्सशी संवाद साधताना अय्यर म्हणाले,

“ती दुखापत खूप वेदनादायक होती. सुरुवातीला तिची गंभीरता मला कळलीच नाही. ‘स्प्लीन’ हा शब्दसुद्धा मला तेव्हा नवीन होता. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तेव्हा लक्षात आलं की ही खूप गंभीर दुखापत आहे.”

पुनरागमनाचा प्रवास

दुखापतीनंतर अय्यर यांनी घरगुती क्रिकेटमधून पुनरागमन केलं. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यांनी ८२ आणि ४५ धावांची खेळी करत चांगला फॉर्म दाखवला. त्यानंतर त्यांची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी ४९ धावा करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

रिकव्हरीने दिला स्वतःकडे पाहण्याचा वेळ

रिकव्हरीबाबत बोलताना अय्यर म्हणाले,

“ही प्रक्रिया मला स्वतःकडे पाहायला भाग पाडणारी होती. मी असा माणूस आहे जो शांत बसू शकत नाही. पण या दुखापतीमुळे मला थांबायला, विचार करायला आणि पूर्ण विश्रांती घ्यायला शिकवलं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ६ ते ८ आठवड्यांत तुम्ही सामान्य व्हाल आणि मगच ट्रेनिंग सुरू करा. मी फक्त योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं.”

मोठ्या फटक्यांबाबत काय म्हणाले?

वापसीनंतर मोठे शॉट्स खेळण्याबाबत विचारले असता अय्यर म्हणाले की ते कोणताही वेगळा प्रयत्न करत नाहीत.

“हे मुद्दाम नाही, ही माझी नैसर्गिक प्रवृत्ती आहे. नेट्समध्ये जितकी जास्त प्रॅक्टिस करतो, तितकं मॅचमध्ये खेळणं सोपं होतं. मी कोणत्या भागात मारायचं हे ठरवत नाही. चेंडू माझ्या एरियात आला, तर मी अटॅक करतो.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version