घरस्पोर्ट्स१४ जूनला भारत–पाक महामुकाबला!

१४ जूनला भारत–पाक महामुकाबला!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने मंगळवारी विमेन्स टी-२० वर्ल्ड कप २०२६चा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. हा बहुचर्चित स्पर्धा १२ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार असून अंतिम सामना ५ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

१२ संघ, दोन गट

या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार असून त्यांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

🔹 गट-१:

भारत, ऑस्ट्रेलिया (६ वेळा विजेता), दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स

🔹 गट-२:

वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड

भारताचे सामने कधी?

  • १४ जून – पाकिस्तान विरुद्ध (एजबेस्टन)

  • १७ जून – नेदरलँड्स विरुद्ध

  • २१ जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध

  • २५ जून – बांगलादेश विरुद्ध

  • २८ जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध

१४ जूनला होणारा भारत–पाकिस्तान सामना हा स्पर्धेतील हाय-व्होल्टेज लढत मानला जात आहे.

आयसीसीची मोठी तयारी

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता म्हणाले की, “विमेन्स टी-२० वर्ल्ड कप २०२६चा कार्यक्रम जाहीर होणे हा मोठा टप्पा आहे. महिला क्रिकेटमध्ये आयसीसी सातत्याने गुंतवणूक करत आहे. अधिक सहभाग, उच्च दर्जाची स्पर्धा, वाढती बक्षीस रक्कम, उत्तम प्रसारण व्यवस्था आणि व्यावसायिक भागीदारी यामुळे या स्पर्धेची प्रतिष्ठा अधिक वाढेल.”

त्यांनी पुढे सांगितले की, “भारतामध्ये झालेल्या महिला वर्ल्ड कपने या खेळाची लोकप्रियता अनेक पटींनी वाढवली. जून-जुलैमधील या स्पर्धेतही तोच उत्साह कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

भारताचे लक्ष्य – पहिल्या विजेतेपदाची आस

आतापर्यंत विमेन्स टी-२० वर्ल्ड कपचे ९ हंगाम पार पडले आहेत. भारताला अद्याप एकही किताब जिंकता आलेला नाही. टीम इंडियाने ४ वेळा उपांत्य फेरी आणि १ वेळा अंतिम फेरी गाठली आहे.

यंदा मात्र भारतीय संघ विजेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version