घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकेंद्रीय बँकांमध्ये पुन्हा गोल्ड रश

केंद्रीय बँकांमध्ये पुन्हा गोल्ड रश

सोन्याचे दर घसरल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार घायकुतीला आले आहेत. जगभरातील केंद्रीय बँकांना मात्र ही संधी वाटते आहे. सोन्याचे भाव घटले की वाढले यामुळे त्यांना काडीचाही फरक पडत नाही. केंद्रीय बँका रणनीती आखून सातत्याने सोन्याची खरेदी करीत आहेत. सोन्याचा साठा वाढवत आहेत. २०२५ च्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत झालेली सोने खरेदी ४२ टक्के जास्त आहे. ज्या गुंतवणूकदारांना सोन्याच्या घसरलेल्या भावाची चिंता आहे, त्यांच्यासाठी केंद्रीय बँकांच्या खरेदीचे हे आकडे अत्यंत दिलासादायक आहेत. सोन्याची दणक्यात खरेदी होते आहे, याचा अर्थ सोन्याला आज बरे दिवस नसले तरी २०२५ ची चमक पुन्हा एकदा येणार, याचे हे संकेत आहेत. जगाच्या अर्थकारणात बरीच उलथापालथ सुरू आहे. डॉलर आज मजबूत दिसतो आहे. अमेरिकेचे बॉण्ड मार्केट देखील तेजीत आहे. त्या तुलनेत सोने कमकुवत झाले आहे. सोन्याचे दर घसरतायत. परंतु हे फार काळ टिकणार नाही, येत्या काळात सोन्याला बरे दिवस येतील अशी शक्यता जागतिक दर्जाच्या विविध वित्त संस्थांकडून व्यक्त केली जाते आहे. भविष्यात डॉलरचा किल्ला कोसळला तर सोने हाच जगासाठी एकमेव पर्याय शिल्लक राहतो. त्यामुळे जगातील देश त्यांच्याकडे असलेले अमेरिकी बॉण्ड विकून त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवतायत. देशाच्या तिजोरीत डॉलरची जागा आता सोने घेत आहे. जे देश अमेरिकी बॉण्डची विक्री करतायत. ते देश सोन्याच्या खरेदीसाठी हा पैसा वळवताना दिसतायत. चीन यात आघाडीवर आहे, कारण चीनला अमेरिकेची जागा घ्यायची आहे. जागतिक महासत्ता व्हायचे आहे. अशा परिस्थितीत त्यांची पहिली स्वाभाविक रणनीती डॉलरची सद्दी मोडून काढण्याची आहे. सध्या डॉलरची जागा घेऊ शकेल असे दुसरे चलन जगात अस्तित्वात नाही. चीनी युआनने ही जागा घ्यावी यासाठी भारतासह अनेक देशांची तयारी नाही. किंबहुना विरोधच आहे. त्यामुळे ज्यांना डॉलरच्या जाळ्यातून सुटका करून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी सोने हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version