घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणदुग्धालयात राहुल गांधींना हवाय खिमा पाव...

दुग्धालयात राहुल गांधींना हवाय खिमा पाव…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी भारी गडबड आहे, हे जनतेच्या हळूहळू लक्षात येत आहे. उडप्याच्या हॉटेलात जाऊन ते सांगतात, “मला माझी हजामत करायची आहे.” इथे हजामत होत नाही, असे उत्तर मिळताच ते आदळआपट करायला लागतात. त्यांच्या लक्षातच येत नाही की, हजामत केशकर्तनालयात होते, हॉटेलात नाही. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना भेटण्याची वेळ काँग्रेस नेत्यांनी मागितली होती. सरन्यायाधीशांनी स्पष्ट नकार दिला आणि त्याची ठोस कारणेही दिली. राहुल गांधींची तऱ्हाच वेगळी! ते पत्रकारांसमोर पुरावे ठेवतात आणि जिथे पुरावे ठेवायचे, त्या सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढतात. प्रत्येक ठिकाणी त्यांची जागा चुकते आहे. महत्त्वाच्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींमध्ये राहुल गांधी यांनी कमालीची दहशत निर्माण केली आहे. हा माणूस चार भिंतींच्या आड आपल्याला भेटायला येईल आणि बाहेर जाऊन आपल्या नावावर वाटेल त्या थापा मारेल, अशी भीती त्यांना वाटू लागलेली आहे. अलीकडेच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा अनुभव घेतला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत बहुधा त्यामुळेच सावध झाले. त्यांची भूमिका स्पष्ट आहे, ‘ज्या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचे आहे, ते मुद्दे न्यायप्रविष्ट आहेत. त्या मुद्द्यांवर मी चर्चा करू शकत नाही. त्या संदर्भात काही बोलायचे असेल, तर पुराव्यांसह तुम्ही न्यायालयात बोलू शकता. सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे देशात सर्वांसाठी खुले आहेत.’ सरन्यायाधीश हे काही लोकसभेचे अध्यक्ष नाहीत. त्यांच्याकडे शिष्टमंडळ न्यायचे नसते. न्यायालयात त्यांच्यासमोर तर्कपूर्ण युक्तिवाद करायचा असतो आणि त्या तर्काची पुष्टी करणारे पुरावे ठेवायचे असतात. काँग्रेसचा दुटप्पीपणा टीपेला पोहोचला आहे. एका बाजूला न्यायालयात काँग्रेसचा अजेंडा रेटणारे कपिल सिब्बल म्हणतात की, आता सर्वोच्च न्यायालयावर विश्वास उरलेला नाही; तर दुसऱ्या बाजूला सिब्बल यांच्या गळ्यात ज्यांचा पट्टा आहे, ते राहुल गांधी सरन्यायाधीशांकडे भेटीची वेळ मागतात.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version