घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानतोंडावर आपटणाऱ्या वाचाळवीरांना आवरा !

तोंडावर आपटणाऱ्या वाचाळवीरांना आवरा !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आणि तोंडावर आलेल्या या निवडणुकांचे कसलेही भान नसलेल्या वाचाळवीरांनी आपले तोंड सोडले आहे. महाराष्ट्रात महिलांचा कधी नव्हे इतका सन्मान करणारी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना या सरकारने सुरु केली आहे. आज लाखो महिला राज्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत असताना विदर्भातील अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी महिलांनी जर मतदान केले नाही तर पैसे परत घेण्याचे विधान करून विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आयते कोलीत दिले आहे. अशा वाचाळवीरांना वेळीच आवरण्याची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version