घरविशेषआंबेनळी घाटात ४०० फूट दरीत टेम्पो कोसळला

आंबेनळी घाटात ४०० फूट दरीत टेम्पो कोसळला

महाबळेश्वरमध्ये मोठा अपघात झाला आहे. एक टेम्पो दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. महाबळेश्वरातील आंबेनळी घाटात ४०० फुट दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पोत काही प्रवासी असल्याची माहिती आहे.

महाबळेश्वरकडून प्रतापगडाकडे निघालेल्या टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. महाबळेश्वरकडून प्रतापगडाकडे जाणार टेम्पो आंबेनळी घाटात ४०० फूट दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहेत. मेटतळे या गावाजवळ टेम्पो दरीत कोसळल्याचं सांगितलं जात आहे. टेम्पो सुमारे ४०० फूट खोल दरीत गेला. टेम्पोत प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. महाबळेश्वर ट्रेकरचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

हे ही वाचा:

ज्या महिलेला शाहजहान शेखने दिल्या जखमा ती लढवणार लोकसभा निवडणूक!

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का

भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील तीन उमेदवार

गदारोळानंतर काँग्रेसकडून सुनील शर्मा यांची उमेदवारी मागे!

घाटातून प्रवास करणाऱ्यांनी ही दुर्घटना पाहिली आणि प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली. अपघातग्रस्त प्रवासी मदतीसाठी वाट पाहत असून टाहो फोडत असून ट्रेकर्सचं पथक त्यांच्या बचावासाठी दाखल झालं आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version