घरविशेषमुंबई सेंट्रल–इंदूर स्पेशल ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावणार

मुंबई सेंट्रल–इंदूर स्पेशल ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावणार

५ नोव्हेंबरपासून वाढीव फेऱ्यांना सुरुवात

प्रवाशांची वाढती मागणी आणि प्रवासाची सोय लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल–इंदूर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या फेऱ्या आठवड्यातून दोन दिवसांवरून तीन दिवस करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई आणि इंदूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

रेल्वेच्या नियोजित वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०९०७९ मुंबई सेंट्रल–इंदूर स्पेशल ट्रेन ५ नोव्हेंबर २०२६ पासून दर मंगळवार, गुरुवार आणि रविवार अशा आठवड्यातून तीन दिवस मुंबई सेंट्रल येथून सुटेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०९०८० इंदूर–मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेन ५ नोव्हेंबरपासून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशा तीन दिवस इंदूर येथून धावणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे.
हे ही वाचा:
इस्रायलमध्ये निवडणूक वोट चोरीचा दावा फेटाळला

अहिल्यानगर–येवला रेल्वेमार्गावर ‘कवच ४.०’ची सुरक्षा चाचणी यशस्वी

डिजिटल फसवणूक झाल्यास बँकांना भरपाई द्यावी लागणार

लंगोटी सुटली तरी नाचतोय अब्दुल!

या वाढीव फेऱ्यांसाठी तिकीट आरक्षण ३० ऑक्टोबर २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) काउंटरवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version