घरविशेषछत्रपती संभाजीनगर- जालना महामार्गावरील बस अपघातात २५ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर- जालना महामार्गावरील बस अपघातात २५ जण जखमी

चार जणांची प्रकृती चिंताजनक

जालना जिल्ह्यात खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर- जालना महामार्गावर सोमवार, २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही खासगी बस थेट पूलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. तर, यातील चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

छत्रपती संभाजीनगर- जालना महामार्गावरून पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची बस प्रवास करत होती. ही बस पुण्याहून नागपूरला जात होती. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास बस बदनापूर येथे असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली. ही घटना छत्रपती संभाजीनगर -जालना महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ घडली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच बदनापूर आणि जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये २५ प्रवाशी जखमी झाले असून ४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत जोगेश्वरीचे नगरसेवक प्रवीण शिंदे आता शिवसेनेत

काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड!

शतकवीर श्रेयस अय्यर म्हणाला, मला एकटेपणाने ग्रासले होते!

कारमधील एअरबॅग ‘गहाळ’ केल्याप्रकरणी आनंद महिंद्रा आणि अन्य १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

अपघातग्रस्त बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुण्यातून नागपूरच्या दिशेने निघाली होती. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version