घरविशेषदोषी अभियंते, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून पैसे कापणार!

दोषी अभियंते, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून पैसे कापणार!

मुंबई महापालिकेतील ढिसाळ कारभाराविषयी अनेकवेळा चर्चा झालेली आहे. सध्याच्या घडीला आता एक नवीन प्रकरण समोर आलेले आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील २४ वॉर्डातील लहान रस्ते, गटारांची दुरुस्ती अथवा स्वच्छता, लादीकरण आदी विविध कंत्राट कामे पालिकेतर्फे नियमितपणे करण्यात येतात. याकरता स्थापत्य कंत्राट (सी.डब्ल्यू.सी.) कामांतील निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेप्रकरणी उपायुक्त स्तरावरील त्रिसदस्यीय समितीने केलेल्या सखोल चौकशीत प्रारंभी दोषी आढळून आलेल्या ८३ पैकी २० अभियंता, कर्मचारी यांना दोषमुक्त करण्यात आले आहे तर उर्वरित ६३ अभियंता, कर्मचारी यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळेच आता यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावावर खरमरीत व जोरदार चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

या ६३ पैकी ५० अभियंता, कर्मचारी यांच्यावर किरकोळ शिक्षेची कारवाई करण्यात येणार आहे तर उर्वरित १३ पैकी एका अभियंत्याचा मृत्यू झाल्याने १२ अभियंते, कर्मचारी यांच्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.
सदर १२ दोषींमधील, विलास कांबळे, कार्य. अभियंता यांच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून एका महिन्यासाठी १५०० रुपये, सुनील एकबोटे, तत्कालीन कार्य. अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून कायमस्वरूपी ३००० रुपये, सुनील पाबरेकर, कार्य.

हे ही वाचा:

जान मोहम्मद हे केवळ प्यादे; मुख्य सूत्रधार मुंबईत

‘मोंदीच्या काळात अल्पसंख्याक १०० टक्के सुरक्षित’

टेलिकॉम क्षेत्रात आता करता येणार १००% परकीय गुंतवणूक

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण पर्व

अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून कायमस्वरूपी ४००० रुपये, निखिलचंद मेंढेकर, कार्यकारी अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून कायमस्वरूपी ३००० रुपये तर सत्यप्रकाश सिंग कार्य. अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून कायमस्वरूपी ३,५०० रुपये कायमस्वरूपी वसूल करण्यात येणार आहेत.

तसेच, साईनाथ पावसकर कार्यकारी अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून ३,५०० रुपये फक्त एका महिन्यासाठी, सुनील भाट, दुय्यम अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून १,५०० रुपये फक्त एका महिन्यासाठी, विवेक गद्रे, दुय्यम अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून कायमस्वरूपी ३,००० रुपये,निशिकांत सोमा पाटील, सहाय्यक अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून कायमस्वरूपी ३,००० रुपये, परमानंद परूळेकर, दुय्यम अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून कायमस्वरूपी ३,५०० रुपये, तर प्रदीप निलवर्ण, दुय्यम अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून कायमस्वरूपी १,५०० रुपये, छगन भोळे, दुय्यम अभियंता याच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनातून कायमस्वरूपी १,५०० रुपये वसूल करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version