घरविशेषमानखुर्दमध्ये बेस्ट बस दुभाजकावर आदळली; पादचाऱ्याचा मृत्यू

मानखुर्दमध्ये बेस्ट बस दुभाजकावर आदळली; पादचाऱ्याचा मृत्यू

चालक-वाहक जखमी

सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथील विश्वकर्मा रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी बेस्टच्या बसचा अपघात होऊन एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसचा चालक आणि वाहक जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९.१४ वाजण्याच्या सुमारास बेस्टच्या ५०१ क्रमांकाच्या मार्गावरील बसने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुभाजकाजवळ उभे असलेले भास्कर रावसाहेब पांडे (वय ६५) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातात बसचे चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (वय ५१) आणि वाहक वैभव वाघमारे (वय ४१) हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, बसवरील नियंत्रण कसे सुटले याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

हे ही वाचा:

ठाकरेंच्या दादरमधील आंदोलनाप्रकरणी तीन गुन्हे दाखल

“जिथे तथ्य, तर्क असतात, तिथे गोंधळाला जागा नसते”

सॅलड खाल्लं आणि रुग्णालय गाठलं! अमेरिकेत लेट्यूसमुळे अतिसारचा उद्रेक

वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर अर्जेंटिनात हिंसाचार; चाहत्यांचा संताप अनावर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version