काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांकडून घटनात्मक संस्थांविरोधात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये, अराजकतेच्या माध्यमातून देशात सत्तापालट व्हावा यासाठी सुरू असलेले प्रयत्न, त्यासाठी केली जाणारी आंदोलने आणि तशा आंदोलनांना पाठिंबा, एसआयआर केला जाणारा विरोध, या मुद्द्यांवरून भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ या अभियानाअंतर्गत देशभरात देशभरात एल्गार पुकारण्यात आला आहे. याच अभियानांतर्गत मुंबईतही भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नागरिकांना या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पीयूष गोयल यांनी एका संदेशाद्वारे भारताच्या विकासाचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा, हरित ऊर्जा, उत्पादन आणि नवोन्मेष अशा विविध क्षेत्रांत देश वेगाने प्रगती करत आहे. मात्र, काही लोकांना देशाची ही प्रगती पाहवत नसून ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांसारख्या घटनात्मक संस्थांचा अपमान केला जात असल्याचेही ते म्हणाले.
मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, या प्रक्रियेलाही विरोधकांकडून विरोध केला जात असल्याचा मुद्दा गोयल यांनी उपस्थित केला. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि देशातील अराजकता संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता बोरिवली रेल्वे स्थानकापासून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. या पदयात्रेत सहभागी होऊन देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहन पीयूष गोयल यांनी केले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या पदयात्रेच्या माध्यमातून अराजकता पसरवणाऱ्यांच्या विरोधात आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.
भव्य पदयात्रा…
अराजकतावाद्यांच्या विरोधात आवाज बुलंद करा— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 29, 2026
हे ही वाचा:
प्रकृतीवर प्रश्न विचारताच ट्रम्प पत्रकारावर संतापले
नागपूर पदवीधर मतदार संघाने काँग्रेसची लाज राखली
मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
नितीन नबिन यांच्याकडून दिल्लीत पदयात्रा
दरम्यान, याच अभियानांतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांनी २८ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील ऐतिहासिक चांदणी चौक परिसरात ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रेत सहभाग घेतला होता. लाल किल्ला चौकापासून सुरू झालेली ही पदयात्रा टाउन हॉल चौकापर्यंत काढण्यात आली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.
