घरविशेषभूतानच्या पंतप्रधानांना बघावं वाटतंय राममंदिर!

भूतानच्या पंतप्रधानांना बघावं वाटतंय राममंदिर!

अयोध्येच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती 

भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे भारत दौऱ्यावर येणार असून ते ५ सप्टेंबर रोजी अयोध्येला भेट देतील आणि रामजन्मभूमी मंदिरात प्रार्थना करतील, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी निखिल टिकाराम फुंडे यांनी बुधवारी सांगितले.
निखिल टिकाराम फुंडे यांनी सांगितले की, भूतानच्या पंतप्रधानांचे लाल कार्पेटवर स्वागत केले जाईल आणि त्याच दिवशी दुपारी शहरातून रवाना होण्यापूर्वी एका खास मेजवानीला उपस्थित राहतील.

एएनआयअशी बोलताना अयोध्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, “५ सप्टेंबर २०२५ रोजी भूतानचे पंतप्रधान सकाळी ९:३० वाजता अयोध्येत पोहोचतील प्रोटोकॉलनुसार त्यांचे लाल कार्पेट स्वागत केले जाईल. त्यानंतर, ते रामजन्मभूमी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी आणि मंदिराचे निरीक्षण करण्यासाठी भेट देतील. त्यांच्या सन्मानार्थ एक विशेष मेजवानी आयोजित केली जाईल आणि ते दुपारी १:३० वाजता निघणार आहेत.”

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शेरिंग तोबगे त्यांच्या पत्नी औम ताशी डोमा यांच्यासह ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असतील. नवी दिल्लीत येण्यापूर्वी या भेटीत गया आणि अयोध्येतील कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, राष्ट्रीय राजधानीतील मुक्कामादरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भेट देणाऱ्या मान्यवरांची भेट घेतील. ही भेट ६ सप्टेंबर रोजी संपेल.

हे ही वाचा : 

China Victory Day: जिनपिंग म्हणाले – चीन कोणाला घाबरत नाही

भारताचे शुल्क शून्यावर आणा आणि माफी मागा!

मध्यम अंतराचा धावपटू परवेझ खानवर डोपिंगप्रकरणी ६ वर्षांची बंदी

USOPEN 2025: जोकोविचने फ्रिट्झला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला

दरम्यान, दाशो शेरिंग तोबगे यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सलग दोन भेटी भारत आणि भूतानमधील सततच्या जवळच्या सहकार्यावर आणि मजबूत झालेल्या संबंधांवर प्रकाश टाकतात. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, मागील भेटीदरम्यान, पंतप्रधान तोबगे यांनी पंतप्रधान मोदींशी भेट घेतली. याशिवाय, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा आणि भारत सरकारच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही भूतानच्या नेत्याची भेट घेतली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version