पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढणं बेकायदेशीर तर आहेच पण अमित ठाकरेंच्या आणि मनसेच्या मनाचा कोतेपणा यातून दिसतो. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मोदींची उठाठेव करण्याचा प्रयत्न अमित ठाकरेंनी करू नये, अशा शब्दांत भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मनसे युवा नेते अमित ठाकरेंचा समाचार घेतला.
पुणे येथील सरकारी महाविद्यालयात जाऊन त्याठिकाणी भिंतीवर असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अमित ठाकरे यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी हटविला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो कसा लागतो, असा सवाल करत मोदींचा फोटो हटविण्यात आला. त्यावर आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदार भातखळकर म्हणाले की, ठिकठिकाणी पंतप्रधानांचे फोटो लावण्यात येतात. अमित ठाकरे यांनी आंदोलन करून फरक पडणार नाही. १२ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतरही ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोक मोदींना पंतप्रधानपदासाठी मान्यता देत आहेत. पण ज्यांना विधानसभा निवडणुकीत घरातल्या मतदारसंघातून निवडून येता आलं नाही आणि निवडून येणं सोडा, दुसऱ्या नंबरवर येणंही जमलं नाही, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उठाठेव करणे सोडावे. एवढा त्यांना सल्ला.
हे ही वाचा:
युद्धाच्या सावटात मोदी-पेझेश्कियन भेट; द्विपक्षीय संबंधांचा आढावा
‘कॉक्रोच’च्या मोर्चाविरोधात आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
वैभव सूर्यवंशीचा धडाका! दुलीप ट्रॉफीत ५७ वर्षांचा विक्रम मोडला
भारताविरुद्ध मालिकेसाठी बांगलादेश उत्सुक
अशी आंदोलने करून काहीही होणार नाही, करोडोंच्या हृदयात मोदींचे स्थान आहे, ते स्थान कष्टामुळे, चारित्र्यामुळे, कर्तृत्वामुळे, प्रामाणिकपणामुळे मिळविलेले आहे. हे स्थान मोदींनी घराणेशाहीमुळे मिळविलेलं नाही, हे अमित ठाकरेंनी लक्षात घ्याव.
ते म्हणाले, महाविद्यालयात राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे फोटो लावण्याची पद्धत आहे, मी अमित ठाकरेंना सांगेन की, आंदोलन करून जबरदस्तीने फोटो काढलेत तरी करोडो लोकांच्या हृदयात मोदींचे स्थान अढळ आहे, तिथून मोदींचे फोटो काढता येणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
