घरविशेषचांद्रयान- ३ पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत यशस्वी पोहचलं

चांद्रयान- ३ पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत यशस्वी पोहचलं

पृथ्वीभोवती पाच फेऱ्या मारल्यानंतर यान चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येणार

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान- ३ चे यशस्वी प्रक्षेपण १४ जुलै रोजी यशस्वी करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात हे यान चंद्रावर पोहचणार आहे. सध्या हे चांद्रयान पृथ्वीभोवतीच्या कक्षेमध्ये फिरत आहे. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या मारल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. दरम्यान, या चांद्रयानाला चौथ्या कक्षेतून पाचव्या कक्षेत यशस्वीपणे ढकलण्यात आलं आहे.

चांद्रयान पृथ्वीभोवती पाच फेऱ्या मारणार असून यानाला मंगळवार, २५ जुलै रोजी पाचव्या कक्षेत ढकलण्यात आले. त्यानंतर काही वेळातच हे चांद्रयान पृथ्वीपासून १ लाख २७ हजार ६०९ किलोमीटर बाय २३६ किलोमीटरच्या कक्षेत पोहोचेल. सध्या या यानाची स्थिती उत्तम आहे. इस्रोने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

यानंतर १ ऑगस्ट रोजी हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यावेळी इस्रोकडून चांद्रयान- ३ ला शेवटचा पुश देण्यात येईल. या टप्प्याला ट्रान्सलुनार इंजेक्शन असं म्हटलं जातं. १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेदरम्यान ही प्रक्रिया पार पडणार आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांचा घणाघात; इस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीननेही ‘इंडिया’ शब्द वापरला!

ब्रदीनाथ महामार्ग वाहून गेल्याने १००० यात्री अडकले

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांची ५ तास चौकशी

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थानचा क्रमांक पहिला

चंद्राजवळ पोहोचल्यानंतर चांद्रयान- ३ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. सर्व काही व्यवस्थित पार पडल्यास, २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान- ३ चंद्रावर लँडिंग करु शकेल असं इस्रोने स्पष्ट केलं आहे. भारताची चांद्रयान- ३ ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत. याआधीचा चांद्रयान-२ द्वारे चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर इस्रो पुन्हा चार वर्षानंतर चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version