घरराजकारणअजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या

अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या

सुनील तटकरेंचा दावा

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल पटेल आणि शरद पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून चर्चांना उधाण आले आहे. विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. अजित पवार असते तर १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे.

“अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या,” असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे. अजित पवार असते तर १२ फेब्रुवारी ही विलिनीकरणाची तारीख निश्चित झाली असती आणि दोन्ही पक्ष एकत्र दिसले असते, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलिनीकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

हे ही वाचा:

विश्वचषकापूर्वी विराटची शतकांची सेंच्युरी कठीण!

मर्सिडीज-बेंझची पुण्यात २०० कोटींची गुंतवणूक

सरन्याधीशांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केरळ काँग्रेसला अवमान नोटीस

‘जलसा’ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनामुळे विलिनीकरणाची चर्चा मागे पडली आहे. अजितदादा यांच्या जवळचा सहकारी असल्याने त्यांनी आपल्याला याबाबत सांगितले होते. त्यामुळे ते हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण निश्चित झाले असते, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version