घरविशेष'आपला पेहराव योग्य, उचित असावा एवढे सामाजिक भान बाळगले पाहिजे'

‘आपला पेहराव योग्य, उचित असावा एवढे सामाजिक भान बाळगले पाहिजे’

चित्रा वाघ यांनी ट्विट करत दिल्या कानपिचक्या

आपल्या शरीरप्रदर्शनाने चर्चेत असलेली उर्फी जावेद या टीव्ही अभिनेत्रीविरोधात भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर त्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून खडे प्रश्न उपस्थित केले.

त्यांनी म्हटले की, कामाचा भाग म्हणून व व्यवसायाची गरज म्हणून कोणते कपडे घालावेत, यावर आक्षेप घ्यायचे कारण नाही. पण समाजात वावरत असताना आपला पेहराव योग्य, उचित असावा, हे सामाजिक भान प्रत्येकानेच बाळगायला हवे. पण असे भान राखले जात नसेल तर त्याला नंगटपणाच म्हणावा लागेल.

सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्यात त्या म्हणतात की, मला साडी नेसायला आवडते, कारण मला त्यात कम्फर्टेबल वाटते. पण इतरांनी हाच पेहराव करावा असे नाही. प्रत्येकाच्या व्यवसायाची गरजही असू शकते. उर्फीसारख्या अल्पसंख्यांक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा वापरण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. तुम्ही कंना राणावत, केतकी चितळे, अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर आक्षेप घेऊ शकाल का?

हे ही वाचा:

अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही

अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!

‘विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांमुळे विज्ञान सशक्त होते’

 

त्यावर चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देताना ट्विट केले की, व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान न राखता त्याचा अतिरेक केला जात असेल तर त्याला रोखणे हा आपला धर्म नाही का? लेकी बाळी आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहेत. त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का?

चित्रा वाघ यांनी पुढे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त असा सवाल उपस्थित केला की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचला त्यांना स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या लेकी अभिप्रेत होत्या का? जिथे समाजस्वास्थ्य महत्त्वाचे तिथे राजकारण करण्याची गरज काय? सावित्रीचे संस्कार आपण जपूया.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version