नेपाळमधील अस्थिरतेचा दुर्गापूजेला फटका; “यंदा मंडप नाही, मंदिरातच पूजा”

पाणिटंकी व्यापारी समितीचे सचिव दीपक चक्रवर्ती यांचे वक्तव्य 

नेपाळमधील अस्थिरतेचा दुर्गापूजेला फटका; “यंदा मंडप नाही, मंदिरातच पूजा”

नेपाळमधील अस्थिरतेचा फटका सीमेलगतच्या भारतातील सण आणि उत्सवांनाही बसू लागला आहे. पश्चिम बंगालच्या  पाणिटंकी व्यापारी समितीच्या दुर्गापूजा समितीचे सचिव दीपक चक्रवर्ती यांनी सांगितले की, नेपाळच्या परिस्थितीमुळे सर्व दुकाने बंद असून, विक्री ठप्प झाल्याने पूजेसाठी देणग्याही मिळालेल्या नाहीत.

त्यांनी स्पष्ट केले, “सध्या इथे सर्व दुकाने बंद आहेत… विक्री नाही, त्यामुळे बजेटही घटवावं लागलं आहे. आम्हाला अद्याप देणग्या मिळालेल्या नाहीत. आज आम्ही बजेटवर बैठक घेणार आहोत. यंदा मंडप उभारण्यात येणार नाही. मंदिरातच दुर्गापूजा पार पडेल. सरकारकडून आम्हाला फक्त ₹१,१०,००० मिळाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सजावट किंवा कार्यक्रम होणार नाही.”

चक्रवर्ती यांनी सांगितले की, “नेपाळमधून मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक येथे येतात. पण सध्याच्या स्थितीत गर्दीही कमी असेल. यंदाची पूजा आमची ५०वी वर्षपूर्ती होती, पण ती साधेपणाने साजरी करावी लागणार आहे.”

हे ही वाचा : 

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी

“मोदींना आईचं दर्शन शुभ… राहुल गांधींना दिसतात ईडी, सीबीआय आणि परदेशी मालमत्ता”

पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा देण्यासाठी भारतासह १४१ देशांचा पाठींबा

इंदूर: शेजाऱ्याची खिल्ली उडवण्यासाठी कुत्र्याचे नाव ठेवले ‘शर्माजी’

दरम्यान, नेपाळच्या काठमांडूमधून कर्फ्यू उठवण्यात आला आहे. लष्कराने कर्फ्यू आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते, जे आज पहाटे ५ वाजल्यापासून उठवण्यात आले. नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर आणि परिस्थिती सामान्य झाल्यानंतर लष्कराने हा निर्णय घेतला आहे. तथापि, लष्कर आणखी काही दिवस रस्त्यावर राहण्याची अपेक्षा आहे.

Exit mobile version