घरविशेषजम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये चकमक, दोन दहशतवादी टिपले!

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये चकमक, दोन दहशतवादी टिपले!

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरूच

- Advertisement -

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील गोहलन भागात सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुरक्षा दलाकडून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, याआधी बुधवारी (२१ जून) बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दोघेही तस्कर-ए-तैयबाशी संबंधित होते.

हे ही वाचा:

सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीला रवाना!

जालन्यातील लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे उपोषण स्थगित!

‘राम वन गमन पथ’ आणि ‘कृष्ण पथ गमन’ प्रकल्प राज्यात वेग घेणार!

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच बाबूंचे बुल्डोझरास्त्र!

दरम्यान, उरी सेक्टरमध्ये एलओसीजवळ आज (२२ जून) दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. घुसखोरीचा प्रयत्न करत असताना सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना ठार केले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु असल्याची माहिती आहे. सुरक्षा दल देखील सर्व ठिकाणी नजर ठेवून सतर्क झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version