घरविशेषअखेर प्रतीक्षा संपली; देवभूमीत मान्सूनचे आगमन!

अखेर प्रतीक्षा संपली; देवभूमीत मान्सूनचे आगमन!

भारतीय हवामान विभागाची माहिती

अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली असून मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे.

केरळच्या बहुतांश भागांमध्ये गुरुवार, ८ जून रोजी सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र मान्सून यायला ८ जून उजाडला आहे. तळकोकणात १६ जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हे ही वाचा:

…म्हणून ममता बॅनर्जी यांनी मोदींना पाठवले लक्ष्मणभोग आंबे!

आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे स्थितीत

‘स्टीव्ह स्मिथ आमच्या पिढीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज’

‘गोव्यातील पोर्तुगीजांच्या खुणा पुसण्याची वेळ आली’

एका आठवड्याच्या विलंबानंतर केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. देवभूमी केरळमध्ये मान्सूनने धडक दिल्यानंतर आता लवकरच राज्यात मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास एक आठवडा उशिराने मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे आता उकड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version