घरविशेषअर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री सीतारमण विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री सीतारमण विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकसभेच्या गॅलरीतून केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी

१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशातील विविध भागांतील सुमारे ३० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकसभेच्या गॅलरीतून केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी दिली जाणार असून, त्यामुळे त्यांना वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या संसदीय प्रक्रियांपैकी एक अनुभवता येणार आहे. हे विद्यार्थी भारतातील विविध राज्यांमधून असून वाणिज्य, अर्थशास्त्र, वैद्यकीय शिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसह विविध शैक्षणिक शाखांचे प्रतिनिधित्व करतात.

विद्यार्थी कर्तव्य भवन- १ येथील अर्थ मंत्रालयालाही भेट देणार असून, मंत्रालयाचे कामकाज, धोरणनिर्मिती प्रक्रिया आणि राष्ट्रनिर्माणात संस्थांची भूमिका समजून घेण्यासाठी ते विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. यानंतर सायंकाळी वित्तमंत्री सीतारमण विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून अर्थसंकल्पाच्या प्रमुख प्राधान्यक्रमांवर, भारताच्या भविष्यासाठी असलेल्या दृष्टीकोनावर आणि तरुणांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर चर्चा करतील. या संवादादरम्यान विद्यार्थीही आपले विचार, दृष्टिकोन आणि आकांक्षा मांडतील तसेच युवक आणि राष्ट्राविषयी आपले मत व्यक्त करतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

“आसिम मुनीर आणि मी जगभर पैसे मागण्यासाठी जातो, तेव्हा लाज वाटते”

सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री

पूर्व कांगोतील कोल्टन खाण कोसळली

‘GaN’ लष्करी तंत्रज्ञानात डीआरडीओचा ब्रेकथ्रू,

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना वित्त, अर्थशास्त्र, प्रशासन आणि लोकशाही प्रक्रियांबाबत अधिक जागरूक करणे, तसेच भारताच्या आर्थिक व संसदीय प्रक्रियांमध्ये तरुणांचा सुजाण आणि सकारात्मक सहभाग वाढवणे हा आहे. अर्थसंकल्प तयार करताना, विविध मंचांद्वारे तरुणांसह देशातील नागरिकांकडून अनेक सूचना मागवण्यात आल्या असून त्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये प्रतिबिंबित होतील. निवेदनात पुढे म्हटले आहे की, हा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तरुणांच्या आकांक्षा आणि आवाजाला महत्त्व देते, याचे प्रतीक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version