रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास संदेशासह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी भारत-रशिया भागीदारी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाचे कौतुक केले असून, ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान मिळालेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
क्रेमलिनने या संदेशाचा काही भाग शेअर केला आहे. पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख सन्माननीय व्यक्ती म्हणून करताना म्हटले आहे, “आपण (पंतप्रधान मोदी) आपल्या देशवासीयांमध्ये तसेच जागतिक स्तरावर अत्यंत सन्माननीय व्यक्ती आहात. भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आपल्या वैयक्तिक योगदानाचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी आपला ७६वा वाढदिवस साजरा करत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी नुकताच नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी (१२-१३ सप्टेंबर) भारताचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घेतली होती. या भेटीचाही उल्लेख संदेशात करण्यात आला आहे. भारतामध्ये मिळालेल्या पाहुणचाराचे कौतुक करताना पुढे म्हटले आहे, “गेल्या आठवड्यात नवी दिल्लीच्या माझ्या दौऱ्यादरम्यान मला आणि रशियन शिष्टमंडळाला मिळालेल्या उबदार आणि स्नेहपूर्ण स्वागताबद्दल तसेच पाहुणचाराबद्दल मी आभार व्यक्त करू इच्छितो.”
Russian President Vladimir Putin sends a message to PM Modi, congratulating him on his 76th birthday
Russian Embassy in India shares the text of the message from President Putin to PM Modi – “You are rightly enjoying deep respect from your compatriots and great authority on the… pic.twitter.com/bYoDlTMloJ
— ANI (@ANI) September 17, 2026
हे ही वाचा:
ब्रिटनमध्ये इंग्रजी भाषण गाजल्यानंतर शिंदेंचे गुजरातीत भाषण
युपीआय चालवणे स्वस्त नाही; राहुल गांधींच्या विरोधात ओमर अब्दुल्लांची भूमिका
अमेरिकेच्या निर्बंध विधेयकानंतर भारत ऊर्जा सुरक्षा, आर्थिक हितांवर ठाम
‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची झेप!
यासोबतच द्विपक्षीय चर्चेला ठोस आणि अर्थपूर्ण संबोधत पुढे म्हटले आहे, “आपली चर्चा निःसंशयपणे ठोस, स्पष्ट आणि अर्थपूर्ण होती. नेहमीप्रमाणेच, आपल्याशी संवाद साधताना मला खूप आनंद झाला आणि आपल्या चर्चेतून पुन्हा एकदा आपली असामान्य राजकीय समज आणि दूरदृष्टी दिसून आली. आपल्या मित्रदेशांच्या हितासाठी महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपण निश्चितच आपले रचनात्मक सहकार्य सुरू ठेवू.”
