घरविशेषअनामत रक्कम, अग्निसुरक्षा शुल्क भरणार नाही! गणेशोत्सव मंडळांची भूमिका

अनामत रक्कम, अग्निसुरक्षा शुल्क भरणार नाही! गणेशोत्सव मंडळांची भूमिका

मंडळांनी प्रामुख्याने त्यांच्याकडे या वर्षाच्या १००० रुपये अनामत रकमेवर व्यक्त केली चिंता

मुंबईतील बहुतेक गणेशोत्सव मंडळांनी पालिकेचे डिपॉझिट आणि अग्निसुरक्षा शुल्क भरण्यास नकार दिला आहे. गणेशोत्सव आयोजकांनी बुधवारी मुंबई महापालिका, पोलिस, वाहतूक आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आगामी गणेशोत्सवाच्या व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. गणेशोत्सवाचे समन्वयक पालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मंडळांनी प्रामुख्याने त्यांच्याकडे या वर्षाच्या १००० रुपये अनामत रकमेवर चिंता व्यक्त केली. रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जाणाऱ्या छोट्या गणेशोत्सव मंडपांना ही अनामत रक्कम भरणे कठीण होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुंबईतील दोन मोठ्या मंडळांना दररोज सरासरी एक लाख रुपये अग्निशमन दलाचे शुल्क आकारले जात आहे, यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर म्हणाले, “दोन प्रमुख समस्या आहेत. पहिली म्हणजे मंडप उभारणीच्या परवानगीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व मंडळांवर मुंबई महापालिका एक हजार रुपये अनामत रक्कम आकारणार आहे. असे प्रथमच केले जात आहे. दुसरे म्हणजे, ते जीएसबी किंग्ज सर्कल आणि लालबागचा राजा या दोन मोठ्या मंडळांवर अग्निशमन दलाचे शुल्क आकारले जाणार आहे. मंडळांनी अग्निसुरक्षा राखण्यासाठी खबरदारी घेतली असल्याने आम्ही हे शुल्क लागू न करण्याची विनंती केली आहे.’

ते पुढे म्हणाले, “गणेशमंडपासाठी एक हजार रुपयांची नवीन अनामत रक्कम आकारणे योग्य नाही. त्याची काहीही गरज नाही. तसेच, अग्निशमन दलाची आकारणीही अधिक आहे. दोन्ही मंडळे तसेच, अग्निशमन अधिकारी योग्य ती खबरदारी घेतात. मात्र महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने यावर्षी ठेव शुल्क कमी केल्याचे स्पष्ट केले. आता ही रक्कम एक हजार रुपये आहे. गेल्या वर्षी ही रक्कम चार हजार रुपये होती. आम्ही पर्यावरणपूरक गणपती उत्सवाला प्रोत्साहन देत आहोत,” असे ते म्हणाले. मात्र अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने कोणतेही शुल्क लावण्याच्या कोणत्याही सूचना नाहीत, असे स्पष्ट केले.

हे ही वाचा:

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा फॉर्म्युला ठरला; तीन पक्षांमध्ये ‘अशी’ होणार वाटणी

वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्यांनी केले ५५ लाखांचे नुकसान

अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाहीत ते मोदींना नऊ वर्षांत काय केलं विचारतायत

विद्यार्थ्यांना टिळा, गंध लावण्यास शाळेचा विरोध

लालबागचा राजा तसेच जीएसबी सेवा मंडळ, किंग्ज सर्कल या दोन मोठ्या मंडळांनी स्पष्ट केले की, त्यांच्याकडून नियमितपणे परिसराबाहेर अग्निशमन दलाच्या गाड्या ठेवण्याचे शुल्क आकारले जाते. दोन्ही ठिकाणी लाखो भाविक येतात. लालबागच्या राजाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे म्हणाले, “आम्ही नेहमीच अग्निशमन गाड्यांसाठी भाडे देतो आणि आम्ही आगाऊ त्यासाठी अर्जही करतो. आम्ही १० दिवसांपूर्वीच असे केले आहे. आम्ही सर्व प्रक्रियेचे पालन करतो आणि महापालिका व इतर प्राधिकरणांकडून आकारले जाणारे सर्व शुल्क भरतो. तर, ‘महापालिकेने आम्हाला किमान एक अग्निशमन गाडी बाहेर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

 

आम्ही त्या सल्ल्याचे पालन करतो. आम्ही सर्व कायद्याचे पालन करतो. आता या शुल्कात प्रतिदिन एक लाखापर्यंत वाढ झाली आहे. तरीही आम्ही ते भरू. गणेशोत्सव मंडळ छोटे असो अथवा मोठे. प्रत्येकालाच पैशांची अडचण भेडसावते आहे. हा मुद्दा आम्ही याआधीही त्यांच्याकडे मांडला होता,’ असे जीएसबी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष आर. जी. भट यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version