घरविशेषबाब-अल-मंदेबवर भारतीय नौदलाची नजर; दोन जहाजांचा सुरक्षित प्रवास

बाब-अल-मंदेबवर भारतीय नौदलाची नजर; दोन जहाजांचा सुरक्षित प्रवास

वेस्टर्न नेव्हल कमांडने दिली माहिती

लाल समुद्र आणि अरबी समुद्राला जोडणाऱ्या बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीत भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आपली समुद्री सुरक्षा क्षमता दाखवून दिली आहे. भारतीय नौदलाच्या मोहिमेवर तैनात पथकाने २५ ऑगस्ट रोजी ‘एमव्ही युनियन मरिनर’ आणि ‘एमव्ही डॅगर’ या दोन व्यापारी जहाजांच्या सुरक्षित प्रवासावर देखरेख ठेवली.

या दोन्ही जहाजांनी बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करावा, यासाठी भारतीय नौदलाच्या तैनात पथकाने आवश्यक देखरेख आणि सुरक्षा व्यवस्था केली. या महत्त्वाच्या सागरी मार्गावर व्यापारी जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीला भारताकडून सातत्याने प्राधान्य दिले जात आहे. यासंबंधीची माहिती वेस्टर्न नेव्हल कमांडने दिली आहे.

बाब-अल-मंदेब हा जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. लाल समुद्र आणि एडनच्या आखातादरम्यान असलेल्या या सामुद्रधुनीतून आशिया, युरोप आणि आफ्रिका यांच्यात मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक केली जाते. त्यामुळे या परिसरातील अस्थिरतेचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता असते.

भारतीय नौदलाने या कारवाईतून भारताकडे येणाऱ्या आणि भारतातून जाणाऱ्या महत्त्वाच्या मालवाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आपली तैनाती कायम असल्याचा संदेश दिला आहे. भारताच्या सागरी हितसंबंधांचे संरक्षण तसेच व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची भारतीय नौदलाची बांधिलकी यामुळे अधोरेखित झाली आहे.

हे ही वाचा:

मुदत संपलेले मासे, अस्वच्छ किचन; बंगळुरूतील हाय-प्रोफाइल क्लबमधील प्रकार

जगभरातील अमेरिकन व्हिसा अपॉइंटमेंट्सला स्थगिती

ऑपरेशन सिंदूरपूर्वी मोदींचे सैन्याला लष्करी कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य!

ऑपरेशन सिंदूरदरम्यान किराणा हिल्सवर हल्ला? माजी सीडीएस काय म्हणाले?

दरम्यान, लाल समुद्र आणि बाब-अल-मंदेब परिसरात व्यापारी जहाजांना निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाची ही तैनाती महत्त्वाची मानली जात आहे. भारताच्या व्यापारासाठी महत्त्वाच्या सागरी मार्गांवर नौदलाचे ‘सुरक्षा कवच’ कायम असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version