भारतीय लष्कराला अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत वेगाने हालचाल करता यावी, यासाठी विशेष सर्वभूभागीय लष्करी वाहनांची निर्मिती सुरू झाली आहे. लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) आणि ब्रिटनची संरक्षण क्षेत्रातील कंपनी बीएई सिस्टिम्स यांनी गुजरातमधील हजीरा येथील एल अँड टीच्या आर्मर्ड सिस्टिम्स कॉम्प्लेक्समध्ये ‘BvS10 सिंधू’ या वाहनाचे उत्पादन सुरू केले आहे. भारतीय लष्कराने या वाहनांच्या १८ नगांची ऑर्डर दिली असून, त्यांचा वापर लडाख आणि कच्छ परिसरात केला जाणार आहे.
लडाखमधील उंच पर्वतीय भागात सुमारे १८ हजार फूट उंचीवर लष्करी मोहिमा राबवताना जवानांना प्रचंड थंडी, बर्फ आणि खडतर भूप्रदेशाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत सामान्य वाहनांची हालचाल मर्यादित होते. ‘BvS10 सिंधू’ हे वाहन या आव्हानांचा विचार करून भारतीय लष्कराच्या गरजांनुसार विकसित करण्यात आले आहे. ते उणे ५५ अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात काम करण्यासाठी तयार करण्यात आले असून, चाचण्यांमध्ये १८ हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवरही त्याची क्षमता तपासण्यात आली आहे.
दुसरीकडे, कच्छच्या रणात उष्ण हवामान, वाळवंटी जमीन आणि दलदलीच्या भागांतून हालचाल करणे हे लष्करासमोरील वेगळे आव्हान आहे. या वाहनांचा वापर अशा भागांत गस्त घालण्यासाठी आणि जवानांची वाहतूक करण्यासाठी होणार आहे. कच्छमध्ये तापमान ५५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे हिमाच्छादित पर्वतांपासून उष्ण रणापर्यंत विविध परिस्थितींमध्ये कार्य करू शकणारे वाहन लष्करासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा:
हसीनांच्या पलायनाचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या माजी हवाई अधिकाऱ्याचा मृत्यू
‘रेजिम चेंज’साठी हिंसा करणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही!
पत्नीला तिकीट मिळवण्यासाठी प्रियांका गांधींना ७ कोटी दिले?
अर्बन दिमागी नक्षल नसीरुद्दीन शाह लोकशाहीसाठी घातक!
‘मेक इन इंडिया’ला बळ
या वाहनाचे उत्पादन भारतात परवाना आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या व्यवस्थेनुसार केले जात आहे. एल अँड टी वाहनांची निर्मिती करणार असून, बीएई सिस्टिम्स हॅग्लंड्स ही मूळ तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी रचना आणि तांत्रिक मार्गदर्शन देणार आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतीय लष्करासाठी १८ वाहनांच्या खरेदीचा करार झाला होता. त्यात सुरुवातीच्या तैनातीपासून देखभाल आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी आवश्यक लॉजिस्टिक मदतीचाही समावेश आहे.
