घरविशेषपत्नीला तिकीट मिळवण्यासाठी प्रियांका गांधींना ७ कोटी दिले?

पत्नीला तिकीट मिळवण्यासाठी प्रियांका गांधींना ७ कोटी दिले?

हरियाणा महिला काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याच्या पतीचा आरोप

पत्नीला निवडणुकीचे तिकीट मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांना ७ कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप हरियाणा महिला काँग्रेसच्या माजी सरचिटणीसांच्या पतीने केला आहे. निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यानंतर गौरव कुमार यांनी दिल्लीतील १० जनपथ या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. गौरव कुमार हे हरियाणा महिला काँग्रेसच्या माजी सरचिटणीसांचे पती आहेत. तिकीट न मिळाल्याने दिलेली रक्कम परत करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान त्यांनी स्वतःला पेटवून घेण्याची धमकीही दिल्याचे वृत्त आहे.

गौरव कुमार यांच्या दाव्यानुसार, पत्नीला काँग्रेसकडून निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी त्यांनी प्रियांका गांधी वड्रा यांना ७ कोटी रुपये दिले होते. मात्र, तिकीट मिळाले नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. याच मागणीसाठी त्यांनी १० जनपथबाहेर आंदोलन केले.

हे ही वाचा:

अर्बन दिमागी नक्षल नसीरुद्दीन शाह लोकशाहीसाठी घातक!

शिक्षक मतदारसंघांत महायुतीचा विजय; पदवीधरांच्या तीनही जागा मविआकडे

भारताच्या दहशतवादविरोधी रणनीती युद्धसिद्ध!

‘JAI’च्या माध्यमातून हिंद-प्रशांतमध्ये सामरिक समीकरणांना बळ

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी यावरून कॉंग्रेसवर टीका केली आहे. हरियाणातील बावल विधानसभा मतदारसंघातून पत्नीला काँग्रेसचे तिकीट मिळवून देण्याच्या आश्वासनाच्या बदल्यात ७ कोटी रुपये घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. दीड वर्ष उलटूनही तिकीट मिळाले नाही आणि पैसेही परत करण्यात आले नाहीत, असे गौरव कुमार यांचे म्हणणे आहे. कुमार यांच्या आरोपानुसार, या कथित व्यवहारात काँग्रेसचे संघटनात्मक सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि खासदार कोडिकुन्निल सुरेश यांच्या स्वीय सहाय्यकांसह प्रियांका गांधी वद्रा यांच्या स्वीय सहाय्यकांची भूमिका होती. प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version