राहुल गांधींनी दाखवलेल्या त्या ‘ब्राझिलियन मॉडेल’चे हे आहे सत्य

राहुल गांधींनी दाखवलेल्या त्या ‘ब्राझिलियन मॉडेल’चे हे आहे सत्य

लोकसभेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतदार यादीत झालेल्या गैरव्यवहारांबाबत गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, हरियाणाच्या मतदार यादीत २५ लाखांहून अधिक बनावट मतदार आहेत. त्यांनी असेही म्हटले की, “हरियाणामध्ये ब्राझिलच्या एका मॉडेलने तब्बल २२ वेळा मतदान केले.” मग प्रश्न असा निर्माण होतो — या मॉडेलचे नाव हरियाणाच्या मतदार यादीत आलेच कसे आणि ही मॉडेल कोण आहे?

ही लेडी कोण आहे?

राहुल गांधी यांनी सभागृहातील मंचावर मोठ्या स्क्रीनवर एक फोटो दाखवला आणि म्हणाले “ही बाई कोण आहे? ही सीमा आहे, स्वीटी आहे, सरस्वती आहे की विलमा? पण ही तर ब्राझिलची मॉडेल निघाली!”
हा संवाद एखाद्या थ्रिलर चित्रपटाच्या पटकथेसारखा वाटतो, पण गांधींच्या दाव्यानुसार, या एकाच चेहऱ्याने हरियाणातील १० पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या नावांनी मतदान केले. आणि हा चेहरा कुणा सामान्य मतदाराचा नसून ब्राझिलच्या मॉडेल ‘मॅथियस फेरेरो’ यांचा आहे. हे नाव ऐकून लोक आश्चर्यचकित झाले, कारण “मॅथियस” हे सहसा पुरुषांचे नाव असते. आता पाहूया, मॅथियस फेरेरो कोण आहेत?

हे ही वाचा:

डीजीपी अनुराग गुप्ता यांनी दिला राजीनामा

“राहुल गांधींचा बॉम्ब फुटतचं नाहीये!” काय म्हणाले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘वंदे मातरम’चं महत्त्व का विषद केलं?

एसआयआर देशासाठी आवश्यक

कोण आहे ही ब्राझिलियन मॉडेल?

राहुल गांधी यांनी सांगितले की, ही प्रतिमा एका ब्राझिलियन मॉडेलची आहे आणि त्यांनी त्या फोटोसोबत छापलेले नाव ‘Matheus Ferrero’ दाखवले. स्वतंत्र पडताळणीत असे आढळले की मॅथियस फेरेरो हे प्रत्यक्षात एक फोटोग्राफर आहेत. राहुल गांधी यांनी जी प्रतिमा दाखवली, तीच छायाचित्र त्यांच्या अधिकृत पोर्टफोलिओमध्ये देखील दिसते. त्या फोटोमध्ये मॉडेलचे नाव नमूद केलेले नव्हते.

फोटोग्राफर मॅथियस फेरेरो यांनी काढलेले या महिलेचे छायाचित्र इंटरनेटवरील रॉयल्टी-फ्री वेबसाइट्स जसे Unsplash किंवा Pexels वर सहजपणे उपलब्ध आहेत. म्हणजेच राहुल गांधी यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेली प्रतिमा ही स्टॉक फोटो मॉडेलची होती, जी कोणीही विनामूल्य वापरू शकतो.

Exit mobile version